कर्नाटक : कन्नड चित्रपटसृष्टीचा स्टार पुनीत राजकुमार यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर जगभरातील चाहत्यांच्या मनावर राज्य केले. त्यांच्या निधनाने सर्वांचेच ह्रदय दुखले असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. ते आपल्यातून गेले असले तरी त्यांच्या डोळ्यांनी एखाद्याल हे जग पाहायला मिळणार आहे. हे कौतुकास्पद काम त्यांनीच नव्हे तर त्यांच्या वडिलांनीही केले. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. राजकुमार यांनी स्वतः 1994 मध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला.
12 एप्रिल 2006 रोजी वयाच्या 76 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आणि आता पुनीत यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. अभिनेता चेतन कुमारने ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'मी अप्पू सरांना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा त्यांचे डोळे काढण्यासाठी डॉक्टरांची टीम तिथे पोहोचली होती. जसे डॉ. राजकुमार आणि निम्मा शिवन्ना यांनी डोळे दान केले, तसे अप्पू सरांनीही केले.''
While I was at hospital to see Appu Sir, a medical group came to remove his eyes in 6-hour window after death
Appu Sir—like Dr Rajkumar & @NimmaShivanna—donated his eyes
Following in their footsteps & in Appu Sir’s memory, we must all pledge to donate our #eyes as well
I do so pic.twitter.com/MsNAv5zGZC
— Chetan Kumar Ahimsa / ಚೇತನ್ ಅಹಿಂಸಾ (@ChetanAhimsa) October 29, 2021
चेतननेही अभिनेता पुनीतसोबतचा स्वतःचा एक फोटो पोस्टमध्ये शेअर केला आहे. एवढेच नाही तर नेत्रदानात सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. पुनीत राजकुमार यांनी वयाच्या 46 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. साऊथचा सुपरस्टार पुनीत यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी सांगितले की, पुनीत राजकुमार यांच्या पार्थिवावर रविवारी कांतीराव येथे पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार केले जातील. एएनआयच्या ट्विटनुसार, अंत्यसंस्कारासाठी अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या मुलीची प्रतीक्षा केली जात आहे. त्यांची मुलगी भारतात पोहोचल्यानंतरच पुनीत यांना अंतिम निरोप देण्यात येईल.