प्रियांका चोप्राने परिधान केला ट्रान्सपरंट स्कर्ट, कॅमेराची लाईट पडताच Oops Moment

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठीही ओळखली जाते.

Updated: Feb 5, 2022, 01:21 PM IST
 प्रियांका चोप्राने परिधान केला ट्रान्सपरंट स्कर्ट, कॅमेराची लाईट पडताच Oops Moment  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठीही ओळखली जाते. प्रियंका अनेकदा Oops Moment ची शिकारही बनते. एकदा ती असे कपडे परिधान करून कार्यक्रमात पोहोचली की, जे पाहून तिचे चाहतेदेखील थक्क झाले.

प्रियंकाचा ड्रेसिंग सेंस
बॉलीवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत नाव कमावलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा जितकी खऱ्या आयुष्यात स्टायलिश आहे तितकीच ती  तिच्या चित्रपटांमध्येही स्टाईलिश दिसते. पण कधी कधी ती  स्टाईलच्या नादात Oops Moment ची शिकार बनते.

कॅमेरात कैद अभिनेत्रीचा Oops Moment
2014 मध्ये प्रियांका चोप्राचं इंग्लिश गाणं 'I Cant Make You Love Me' रिलीज झालं होतं, या गाण्याच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री मुंबईत पोहोचली होती. यादरम्यान, अभिनेत्रीने असा स्कर्ट घातला होता की, ती Oops Moment ची बळी ठरली आणि कदाचित तिला कॅमेऱ्यात काय कैद झालं ते लक्षातही आलं नाही.

प्रियंकाने परिधान केला जाळीदार स्कर्ट
गाण्याच्या रिलीजवेळी तिथे तिची आई, भाऊ, नातेवाईक, मित्र आणि ओळखीचे लोकं उपस्थित होते. प्रियंका चोप्रानेही गाण्यांचा लाईव्ह परफॉर्मन्स दिला. पण सर्वांचं लक्ष तिच्या गाण्यांपेक्षा प्रियांकाच्या कपड्यांवर गेलं. यावेळी प्रियांकाने पांढरा टॉप  घातला होता. यावर तिने काळ्या रंगाचा पारदर्शक जाळीचा स्कर्ट घातला. ज्यातून तिचे अंडरगार्मेन्ट्स स्पष्ट दिसत होते. जसं प्रियांकाच्या अभिनयाचं कौतुक केलं गेले. तसंच हा ड्रेस पाहून तिला ट्रोलही करण्यात आलं होतं.