'मेट गाला 2024'च्या रेड कार्पेटवर दिसणार नाही प्रियांका चोप्रा, या मोठ्या कारणामुळे घेतला निर्णय

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जातोय की, प्रियांका चोप्रा यावर्षी 'मेट गाला 2024'च्या रेड कार्पेटवर जलवा दाखवताना दिसणार आहे. 

Updated: Apr 21, 2024, 07:56 PM IST
'मेट गाला 2024'च्या रेड कार्पेटवर दिसणार नाही प्रियांका चोप्रा, या मोठ्या कारणामुळे घेतला निर्णय title=

Priyanka Chopra Not Attend Met Gala 2024 : बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपली दमदार ओळख बनवणारी ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राच्या चाहत्यांसाठी एक बॅड न्यूज समोर येत आहे. तिचे चाहते तिला 'मेट गाला 2024' च्या रेट कार्पेटवर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. त्यांना ही बातमी खूप नाराज करु शकते. खरतर समोर आलेल्या रिपोर्टनुसार अभिनेत्री या वर्षी 'मेट गाला 2024'चा हिस्सा नसणार आहे. 

होय, नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जातोय की, प्रियांका चोप्रा यावर्षी 'मेट गाला 2024'च्या रेड कार्पेटवर जलवा दाखवताना दिसणार आहे. अभिनेत्री हॉलिवूडसोबत नुकतंच तिने एका मुलाखतीत प्रियांकाने सांगितलं की, ती मेट गाला 2024 ला मिस करेल, कारण ती सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहे, ज्यामुळे ती यावर्षी या स्टार-स्टडेड इव्हेंटचा भाग असणार नाही.

'मेट गाला 2024'चा हिस्सा नसणार प्रियांका चोप्रा
मुलाखतीत प्रियांका चोप्राने सांगितलं की, 'मला सुद्धा माहीत नाही की या वर्षी कोण जाणार आहे? पण मी या वर्षी मेट गालामध्ये सहभागी होणार नाही कारण मी एक चित्रपट करत आहे, मात्र मला वाटतं की मेट गाला दरम्यान लोकांची क्रिएटिविटी पाहून मला खरोखर आनंद मिळतो. याशिवाय, प्रियांका म्हणाली, 'याचा काय परिणाम होणार आहे हे पाहण्यासाठी मी खरंच खूप उत्सुक आहे. या वर्षी रेड कार्पेटवर कोण हजेरी लावणार आहे याबद्दल मला खरोखर माहिती नाही.

 मेट गाला 2024 ची वाट पाहतेय अभिनेत्री
प्रियांकाने पुढे सांगितलं की, 'ती अप्रतिम आहे, म्हणून आम्ही तिची वाट पाहत आहोत'. प्रियंका चोप्राने 2017 मध्ये 'मेट गाला' मध्ये कस्टम राल्फ लॉरेन ट्रेंड कोट ड्रेससोबत डेब्यू केला होता आणि अभिनेत्री दरवर्षी मेट गालामध्ये तिचा लूकचा जलवा दाखवताना दिसते. जर तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच हॉलिवूड प्रोजेक्ट 'हेड ऑफ स्टेट'मध्ये दिसणार आहे, ज्याबद्दल अभिनेत्री खूप उत्सुक आहे.