ट्रान्सपरंट कपड्यात प्रियंका चोप्राचं फोटोशूट, बोल्ड फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला

प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. 

Updated: Jan 14, 2022, 03:06 PM IST
ट्रान्सपरंट कपड्यात प्रियंका चोप्राचं फोटोशूट, बोल्ड फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला title=

मुंबई : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या सौंदर्याची भूरळ घालणारी प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आज ती अशा टप्प्यावर आहे की, ती जे काही करते, तो जगभरात एक ट्रेंड बनतो. प्रियांकाचा अभिनय असो किंवा तिची स्टायलिश स्टाईल, लोक तिच्या प्रत्येक स्टाईलवर फिदा आहेत.

प्रियांकाने दाखवला बोल्ड अवतार
आता या अभिनेत्रीने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर असा एक फोटो शेअर केला आहे. जो पाहून सगळेच थक्क झाले आहेत. अलीकडेच 'देसी गर्ल'ने तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा आतापर्यंतचा सगळ्यात बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया यूजर्स तिच्या बोल्डनेसचे वेडे झाले आहेत.

रेड ट्रांसपरंट कपड़्यात दिसली प्रियंका 
फोटोमध्ये प्रियांका लाल पारदर्शक कपड्यात दिसत आहे. तिचा अभिनयाचे चाहते आज जगभरात आहेत. तिच्या या स्टाईलने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या लूकबरोबर प्रियांकाने हलका मेकअप आणि खुल्या कर्ल्स केसांनी तिचा लूक पूर्ण केला आहे. याशिवाय प्रियांकाने आणखी चार फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. अभिनेत्रीचे हे फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्री नेहमीप्रमाणेच खूपच हॉट दिसत आहे. पोस्ट शेअर करत प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'व्हॅनिटी फेअर, फेब्रुवारी 2022...'. आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांसोबतच सर्व युजर्सही फोटोंवर कमेंट करून प्रतिक्रिया देत आहेत.