'कोख किराए पर ली'; सरोगसीच्या आरोपावर Priyanka Chopra चं मोठं वक्तव्य

Priyanka Chopra नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सरोगसीचा पर्याय का निवडला याविषयी मोठा खुलासा केला आहे. प्रियांकानं लेक मालती मेरी चोप्रा जोनससोबत शेअर केलेला फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

Updated: Jan 20, 2023, 12:17 PM IST
'कोख किराए पर ली'; सरोगसीच्या आरोपावर Priyanka Chopra चं मोठं वक्तव्य title=

Priyanka Chopra On Giving Brith To Daughter By Surrogacy : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. प्रियांका ही आता फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूड चित्रपटसृष्टीत देखील दिसत आहे. प्रियांकानं लेक मालती मेरी चोप्रा जोनससोबत (Malti Marie Chopra Jonas) पहिल्यांदा व्होगमध्ये प्रवेश केला आहे. गुरूवारी प्रियांका आणि मालतीचे पहिले कव्हर शूट झाले. यावेळी प्रियांकानं अनेक गोष्टींवर चर्चा केली आणि अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी मुलीचा सरोगसीद्वारे जन्म झाल्यावर देखील प्रियांकानं वक्तव्य केलं आहे. 'कोख किराए पर ली' या आरोपांवर प्रियांकानं वक्तव्य केलं आहे. 

प्रियांकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून व्होगच्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्रियांका आणि मालतीनं लाल रंगाचे कपडे परिधान केले असून त्यांचं बॅकग्राऊंडदेखील लाल रंगाचे आहे. मुलाखतीदरम्यान मालतीच्या जन्माबाबत प्रियंका म्हणाली, 'मालतीचा जन्म झाला तेव्हा ती ऑपरेशन रूममध्ये होती. ती माझ्या हातापेक्षा लहान होती. मी पाहिलं की आयसीयूव्हीमध्ये नर्स काय करतात, त्या देवापेक्षा कमी नाहीत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे समोरगसीचा पर्याय का निवडला याविषयी बोलताना प्रियांका म्हणाली, मला मेडिकल प्रोब्लेम आहे आणि त्यामुळेच मी स्वतः बाळाला जन्म देऊ शकत नाही. आरोग्याशी संबंधीत समस्या असल्यामुळे बाळाच्या जन्मसाठी माझ्याकडे सरोगसी हाच एक पर्याय होता. सरोगसीद्वारे मी आई झाले, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते आणि ज्या सरोगेटनं सहा महिने आमच्या बाळाची काळजी घेतली तिचे आम्ही आभारी आहोत.  

हेही वाचा : 'ब्रेकअप झाल्यानंतर मुलींना हॉट का दिसायचं असतं? Prajakta Mali च्या चाहत्यांना पडला प्रश्न

'कोख किराए पर ली'  आणि सरोगसीद्वारे रेडीमेड बेबी मिळाला असे आरोप प्रियांकावर करण्यात आले. आई झाल्यानंतर अशा प्रतिक्रिया अपेक्षित आहेत का? असा प्रश्न ब्रिटिश व्होगनं विचारता, त्यावर बोलताना प्रियांका म्हणाली, 'लोक जेव्हा माझ्याबद्दल बोलतात तेव्हा मी माझ्या भावना लपवण्यासाठी स्वत:ला आणखी खंबीर बनवते.' दरम्यान, मालती मेरीच्या जन्मानंतर तिला 100 दिवसांसाठी तिला एनआईसीयूमध्ये ठेवण्यात आले, मग तिला घरी आणले. त्यानंतर प्रियांका आणि निकनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आई-बाबा झाल्याची माहिती दिली. प्रियांका चोप्राने 2018 मध्ये निक जोनाससोबत (Nick Jonas) लग्न केले होते. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये त्यांनी त्यांची मुलगी मालतीचे या जगात स्वागत केले.