कांदे पोहे.... प्रियांका चोप्रा जेव्हा परदेशात ऑर्डर करते भारतीय डिश

इतर काही भारतीय पदार्थ दिसत आहेत.

Updated: Mar 3, 2022, 04:01 PM IST
 कांदे पोहे.... प्रियांका चोप्रा जेव्हा परदेशात ऑर्डर करते भारतीय डिश title=

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा मनाने देसी आहे आणि याचा पुरावा तिने अनेकदा दिला आहे. सध्या प्रियांका पती निक जोनास आणि न्यू बॉर्न बेबीसोबत लॉस एंजेलिसमध्ये दर्जेदार वेळ घालवत आहे. 

दरम्यान, तिने इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये भारतीय जेवणाचा आस्वाद घेताना काही फोटो शेअर केले आहेत. प्रियांकाने शेअर केलेला फोटो तिच्या सकाळच्या नाश्त्याचा आहे. या फोटोत पोहे आणि इतर काही भारतीय पदार्थ दिसत आहेत.

फोटो शेअर करताना प्रियांकाने लिहिले की, लॉस एंजेलिसमध्ये पोहे खाताना मी मुंबईच्या आठवणींमध्ये हरवून गेले. प्रियांकाला भारतीय खाद्यपदार्थांची विशेष आवड आहे.

याच कारणामुळे तिने न्यूयॉर्कमध्ये स्वत:चं रेस्टॉरंटही सुरू केलं आहे, ज्यामध्ये खास भारतीय जेवण दिले जाते.

प्रियांका भारतापासून दूर परदेशात स्थायिक झाली असेल, पण ती मनापासून भारताशी जोडलेली आहे.