प्रियांका चोप्राने कोणाच्या नावावरून ठेवलं मुलीचं नाव?...नावात दडलाय मोठा अर्थ

'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आता पुन्हा चर्चेत आली आहे. प्रियांका परदेशात स्थायिक झाली असली तर भारतातील तिच्या चाहत्यांना तिच्या भारतात परतण्याची आशा आहे.

Updated: Apr 24, 2022, 11:51 AM IST
प्रियांका चोप्राने कोणाच्या नावावरून ठेवलं मुलीचं नाव?...नावात दडलाय मोठा अर्थ title=

मुंबईः देसी गर्ल प्रियांका चोप्रा आता पुन्हा चर्चेत आली आहे. प्रियांका परदेशात स्थायिक झाली असली तर भारतातील तिच्या चाहत्यांना तिच्या भारतात परतण्याची आशा आहे.

प्रियांकाची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. 

प्रियांकाने सरोगसीद्वारे जानेवारी महिन्यात बाळाला जन्म दिला. तीन महिन्यांनंतर प्रियांकाच्या बाळाचं नाव समोर आलं, मात्र या नावामागेही खूप काही दडलंय.

काय आहे प्रियांकाच्या बाळाच्या नावाचा अर्थ पाहुयात

प्रियांकाच्या घरी सरोगसीद्वारे मुलीचं आगमन झालं. प्रियांकाने मुलीचं नाव मालती मेरी चोप्रा जोनास असं ठेवल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. मात्र प्रियांकाने हे नाव का ठेवलं त्याचं कारण आता समोर आलं आहे.

प्रियांकाच्या आईचं नाव आहे मधुमालती चोप्रा. अनेक वेळा प्रियांका आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

आईसोबत प्रियांकाचं नातं खूप खास आहे. त्यामुळे आईच्या नावातलं 'मालती' हे नाव आणि निक ख्रिश्चन असल्याने मेरी हे नाव जोडत 'मालती मेरी' असं नाव प्रियांकाने आपल्या मुलीला दिलं आहे. 

मालती हा संस्कृत शब्द आहे, आणि या शब्दाचा अर्थ सुगंधी फूल असा होतो... चोप्रा आणि जोनास अशी दोघांची आडनावही प्रियांकाने मुलीच्या नावासमोर लावली आहेत.