प्रिंस हॅरी आणि मेकेन मार्कलला प्रियांका चोप्रानेही दिल्या शुभेच्छा

सोमवारी लंडनमध्ये प्रिंस हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्केल यांच्या साखरपुड्याची घोषणा करण्यात आली. तसेच पुढील वर्षी ते विवाहबंधनात अडकणार असल्याची माहितीदेखील दिली आहे. 

Updated: Nov 28, 2017, 04:44 PM IST
प्रिंस हॅरी आणि मेकेन मार्कलला प्रियांका चोप्रानेही दिल्या शुभेच्छा  title=

 मुंबई : सोमवारी लंडनमध्ये प्रिंस हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्केल यांच्या साखरपुड्याची घोषणा करण्यात आली. तसेच पुढील वर्षी ते विवाहबंधनात अडकणार असल्याची माहितीदेखील दिली आहे. 
 
 सुमारे दीड वर्ष मेगेन आणि  प्रिंस एकत्र होते. अखेर सोमवारी त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केली आहे. या गोड बातमीमुळे ब्रिटन, अमेरिकेप्रमाणेच जगभरातील चाहत्यांनी त्यांना शुभार्शिवाद दिले आहेत. 

अभिनेत्री प्रियंका चोप्रादेखील या रॉयल कपलला शुभेच्छा देण्यासाठी पुढे आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं या रॉयल जोडीला शुभेच्छा दिल्या. 

 

Congratulations to my girl @meghanmarkle and Prince Harry!! I’m so happy for you Meg! You deserve the best always..keep smiling that infectious smile. Xoxo 

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

 

 

प्रियंका आणि मार्कलची भेट

काही वर्षांपूर्वी  प्रियंका आणि मार्कलची भेट पहिल्या वार्षिक एले वुमन इन टेलिव्हिजन डिनरमध्ये ओळख झाली. या दोघींची तिथुनच ओळख  आणि मैत्री झाली. 

मेगेन ही हॉलिवूडची अभिनेत्री आहे. हॉलिवूडमध्ये ती काही सीरीज करते. मात्र लग्नानंतरही ती चित्रपटक्षेत्रात काम करणार का ? याबद्दल  कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.