करंटलागून प्रभासच्या चाहत्याचा मृत्यू

'साहो' प्रदर्शित होण्याआधिच चित्रपटला गालबोट    

Updated: Aug 29, 2019, 05:27 PM IST
करंटलागून प्रभासच्या चाहत्याचा मृत्यू title=

मुंबई : 'साहो' चित्रपटाच्या चर्चा सध्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत. परंतू चित्रपट प्रदर्शित होण्याआधिच चाहत्यांच्या उत्साहपूर्ण वातावरणाला गालबोट लागले आहे. ३० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असलेल्या 'साहो' चित्रपटाचे सर्वत्र पोस्टर लावण्यात आले आहे. याच दरम्यान चित्रपटगृहा बाहेर लावण्यात आलेल्या बॅनरवर करंट उतरल्यामुळे प्रभासच्या चाहत्याचा मृत्यू झाला आहे. 

रिपोर्टनुसार प्रभासच्या चाहत्याचा मृत्यू करंट लागल्यामुळे झाला आहे. हा चाहता तेलंगणाचा राहणारा आहे. प्रभास हा चाहता चित्रपटगृहाबाहेर 'साहो'चे बॅनर लावत होता. चित्रपटगृहाच्या इमारतीतून फळीवर बॅनर लावताना विद्युत वायरीचा संपर्क आल्यामुळे त्याला करंट लागला. 

त्यानंतर त्याला तात्काळ रूग्णालयात भरती करण्यात आले. अखेर उपचारा दरम्यान प्रभासच्या चाहत्याचा मृत्यू झाला. मूत्यूची बातमी मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  

'साहो' हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रभास आणि श्रद्धाव्यतिरिक्त चित्रपटात जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे. नील नितिन मुकेश अशी तगडी स्टारकास्टही भूमिका साकारणार आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी 'साहो' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.