सनी लिऑनीनंतर 'बिग बॉस १२' मध्ये पॉर्नस्टार शांती डायनामाइट ?

 यावेळेस पॉर्नस्टार शांति डायनामाइट 'बिग बॉस १२' मध्ये दिसू शकेल.

Updated: Jun 18, 2018, 03:44 PM IST
सनी लिऑनीनंतर 'बिग बॉस १२' मध्ये पॉर्नस्टार शांती डायनामाइट ? title=

मुंबई : 'बिग बॉस' चा प्रत्येक सिझन हा वादानंतर पूर्ण होतो. अनेक वादग्रस्त व्यक्ती यामध्ये सहभागी होत असतात. त्यामुळे मसालेदार, ड्रामेबाज शो चाहत्यांना बघायला मिळतो. 'बिग बॉस १२' साठी ऑडिशन सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली होती. यानंतर पुन्हा 'बिग बॉस' ची चर्चा सुरू झाली. आता अशाही बातम्या येतायत, सनी लिऑनीनंतर आणखी एक पॉर्न स्टार सीजनमध्ये हिस्सा घेणार आहे.  सतत चर्चेत असणाऱ्या आणि वादग्रस्त व्यक्तींना बिग बॉसच्या घराचे आमंत्रण असते हे आपण गेल्या ११ सिझनमध्ये पाहिले आहे. यावेळेस पॉर्नस्टार शांति डायनामाइट 'बिग बॉस १२' मध्ये दिसू शकेल.

आधीही चर्चा 

डायनामाइट सहभागी होणार असल्याची चर्चा काय पहिल्यांदाच होत नाहीए. याआधी 'बिग बॉस ८' च्या वेळेस ती येणार असल्याची चर्चा होती. तिला सहभणागी करून शोचे मेकर्स शोचा टीआरपी आणखी जास्त वाढवू इच्छित असल्याचे म्हटले जात आहे. शांति डायनामाइट अॅडल्ट सिनेमात काम करते. तिची आई पंजाबी असून वडिल मूळचे ग्रीकचे आहेत.  तिचे खर नाव सोफिया आहे. 'चल डॉक्टर डॉक्टर खेले' या सिनेमामुळे शांती चर्चेत आली होती. यामध्ये तिने एक आयटम सॉंग केलं होतं.