'तारक मेहता...' फेम पोपटलालचं आता 100 टक्के होणार लग्न!

'तारक मेहता...' फेम पोपटलालचं आता 100 टक्के होणार लग्न!

Updated: Dec 11, 2021, 03:20 PM IST
'तारक मेहता...' फेम पोपटलालचं आता 100 टक्के होणार लग्न! title=

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या प्रेक्षकांना गरबा क्विन दयाबेन पुन्हा कधी येणार? आणि पत्रकार पोपटलालचं लग्न कधी होणार असा प्रश्न सतावत आहे. मालिकेतील फक्त दयाबेन आणि पोपटलाल चाहत्यांच्या मनात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं नाही तर सर्व पात्र चाहत्यांच्या जवळचे आहेत. दयाबेन कधी मालिकेत येणार? याबद्दल अद्याप काही माहिती मिळाली नाही. पण आता पोपटलालचं लग्न होणार अशी शक्यता आहे. 

आता या मालिकेत सर्वात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. कारण पोपटलाल लग्न करणार आहे. एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये पोपटलालच्या आयुष्यात एका मुलीची एन्ट्री होणार आहे. जिच्यासोबत पोपटलाल लग्न करणार आहे. 

नुकताचं अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये मालिकेची संपूर्ण कास्ट दिसली होती. हा शो पाहून ही मुलगी पोपटलावर फिदा होते. त्यानंतर मुलगीचे आई-वडील गोकूळ धाममध्ये लग्नाची मागणी घालण्यासाठी येतात. व्हिडीओ पहा...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा सोनी सब चॅनलवर प्रसारित होणारी लोकप्रिय मालिका आहे. जो पहिल्यांदा जुलै 2008 मध्ये प्रसारित झाला होता. तेव्हापासून टीव्हीवर मालिकेची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे.