'या' सेलिब्रिटीची मांजर एखाद्या कलाकाराहूनही श्रीमंत; 800 कोटींची संपत्ती

माणसांनंतर आता पाळिव प्राण्यांमध्येही श्रीमंतीची शर्यत, ही मनीम्याऊ जगात सर्वाधिक श्रीमंत... चला जाणून घेऊया कोणती आणि कोणाची आहे ही मांजर

Updated: Jan 6, 2023, 02:46 PM IST
'या' सेलिब्रिटीची मांजर एखाद्या कलाकाराहूनही श्रीमंत; 800 कोटींची संपत्ती title=

Talyer Swift Cat Olivia Richest Pet : अमेरिकनं ‘पॉप क्वीन’ (Pop Queen) टेलर स्विफ्ट (Talyer Swift) ही जगातील लोकप्रिय आणि यशस्वी महिलांपैकी एक आहे. टेलर स्विफ्टला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. फक्त टेलर स्विफ्ट नाही तर तिची मांजर ऑलिव्हिया बेन्सन (Olivia Benson) जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांपैकी एक आहे. टेलर स्विफ्टची मांजर ऑलिव्हिया बेन्सन ही एक स्कॉटिश फोल्ड मांजर आहे. AllAboutCats.com नं दिलेल्या वृत्तानुसार ऑलिव्हिया ही जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांपैकी एक असून ती तिसऱ्या क्रमांकावार आहे. 

टेलर स्विफ्टकडे 2014 पासून ऑलिव्हिया आहे. ऑलिव्हियासोबतच टेरल स्विफ्टकडे आणखी दोन मांजरी आहेत. त्या मांजरींची नावं ही मेरेडिथ ग्रे आणि बेंजामिन बटन अशी आहेत. खरंतर सर्वाधीक कमाई करणाऱ्या पाळीव प्राण्याच्या यादीत मेरेडिथ आणि बेंजामिन या दोघांची नावं नाहीत. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की टेलर स्विफ्ट ही तीन मांजरीची मालकीन असली तरी तिची एकच मांजर सगळ्यात श्रीमंत कसी. (Talyer Swift Has Three Pet Cats)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जगभरातील लोकप्रिय पाळीव प्राण्यांसाठी फोर्ब्स- शैलीची यादी असल्याचे म्हटले जाते. या यादीत प्रत्येक पाळीव प्राणी किती कमाई करत असेल याचा अंदाज लावण्यासाठी त्यांच्या Instagram डेटाद्वारे रिसर्च करण्यात येतो. दरम्यान, सगळ्यात श्रीमंत असणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑलिव्हियाचे स्वतःचे इन्स्टाग्राम अकाऊंट सुद्धा नाही. ऑलिव्हिया ही टेरल स्विफ्ट तिच्या अकाऊंटवरून शेअर करत असलेल्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये दिसते. तर वेबसाइटनं दिलेल्या वृत्तानुसार ऑलिव्हिया या मांजरीची किंमत ही 800 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ऑलिव्हिया ही टेलर स्विफ्टसोबत अनेक जाहिरातींमध्ये दिसली आहे. एवढंच नाही तर टेलर स्विफ्टच्या ब्लँक स्पेस सारख्या काही म्यूझिक व्हिडीओमध्येही ऑलिव्हियानं काम केलं आहे. याशिवाय ऑलिव्हियाची स्वतःची मर्चेंडाइज लाइन आहे. ऑलिव्हियाचे सोशल मीडियावर लाखो चाहते असून तिचे फॅनपेजही आहेत. दरम्यान या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या यादीत ओपरा विन्फ्रेचा श्वान, फॅशन डिझायनर कार्ल लेगेरफेल्डची मांजर यांचाही समावेश आहे. तर फोर्ब्स 2022 च्या अहवालानुसार टेलर स्विफ्ट 4 हजार 700 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. (Pop Queen Taylor Swift S Cat Olivia Benson Is 3rd Richest Pet In World Worth 800 Crore How Know The Details)