मद्यधुंद अवस्थेत पूनम पांडेकडून रेस्टॉरंटमध्ये तोडफोड, Viral Video पाहून कोणीही संतापेल

पूनम पांडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Sep 5, 2022, 11:36 AM IST
मद्यधुंद अवस्थेत पूनम पांडेकडून रेस्टॉरंटमध्ये तोडफोड, Viral Video पाहून कोणीही संतापेल title=

मुंबई : अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) ही तिच्या बोल्ड ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते. ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करत असते. नुकताच पूनमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पूनम रात्री उशिरा पर्यंत पार्टी करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पूनमचं हे कृत्य पाहून नेटकरी तिच्यावर संतापले असून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. 

आणखी वाचा : 'एकनाथ शिंदेंसाठी काहीही करु शकतो'; चित्रपट दिग्दर्शकाची भावनिक पोस्ट

आपल्या बोल्डनेसमुळे लोकांना घायाळ करणारी पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूनम पांडेचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पूनम रेस्टॉरंटमध्ये असल्याचे दिसते. यावेळी रेस्टॉरंटमध्ये पूनमनं एका वेगळ्या प्रकारे मज्जा केल्याचे दिसत आहे. 

पूनमचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हुम्पलानं शेअर केला आहे. या व्हिडीओत पूनम वेगळ्या अंदाजात मस्ती करताना दिसत आहे. या व्हिडीओत पूनम ग्रीस स्टाईलमध्ये अनेक प्लेट्स तोडताना दिसत आहे. पूनमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुसरीकडे, काही नेटकरी पूनमला पुन्हा एकदा टार्गेट करताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : पंकज त्रिपाठींनी 5 स्टार हॉटेलमधून चप्पल चोरली? विश्वास बसणार नाही, पण हे खरंय
नुकतीच पूनम पांडे कंगना रणौतच्या रिअॅलिटी शो 'लॉक अप'मध्ये (Lock Upp) दिसली होती. या शोदरम्यान पूनम  अनेक वादांमध्ये अडकली होती.  पूनमने या शोच्या माध्यमातून तिची इमेज सुधारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शोमधून बाहेर येताच पूनम चर्चेचा विषय ठरली आहे.