सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेली पूनम पांडे का बनवू लागली अडल्ट व्हिडीओज?

पूनमने १८ वर्षांची असताना इंडस्ट्रीत प्रवेश केला

Updated: Mar 11, 2022, 11:52 AM IST
सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेली पूनम पांडे का बनवू लागली अडल्ट व्हिडीओज? title=

मुंबई : कॉन्टेंट क्रिएटर आणि मॉडेल पूनम पांडे हिचा आज वाढदिवस. इरॉटिक व्हिडीओ बनवून पूनम पांडे सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पूनम आपल्या कामामुळे आणि अडल्ट व्हिडीओजमुळे, वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. पूनम पांडेचा आज ११ मार्च १९९१ साली जन्म दिल्लीत झाला. पूनम पांडेचा जन्म हा एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. 

पूनमने १८ वर्षांची असताना इंडस्ट्रीत प्रवेश केला. तिचं शिक्षण दिल्लीत झालं आहे.  २०११ मध्ये कॅलेंडर गर्ल्सची मॉडेल म्हणून पूनमला मॉडेलिंग जगतात ओळख मिळाली. याशिवाय ती ग्लॅडरॅग्स २०१० च्या टॉप आठ स्पर्धकांमध्ये होती. मॉडेलिंगच्या काळात पूनमने अनेक फॅशन मॅगझिनसाठी फोटोशूट केले होते.

पूनम पांडेच्या वडिलांचे नाव शोभनाथ पांडे आणि आईचे नाव विद्या पांडे आहे. तसेच पूनमच्या घरी एक बहीण व एक भाऊ असा परिवार आहे. पूनमच्या वडिलांचा दिल्लीत व्यवसाय आहे. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पूनमने अडल्ट व्हिडीओ बनवण्यास कशी सुरूवात झाली? असा प्रश्न उपस्थित होतो. यामागचे कारण खुद्द पूनमनेच सांगितले आहे.

पूनम म्हणाली होती, जेव्हा मी इंडस्ट्रीत आले तेव्हा काही लोकांनी मला सांगितले की, तू असे काही कर की तू लगेच हिट होशील. तुला वादग्रस्त विधानं करून ही चर्चेत राहावं लागेल. त्या लोकांचे ऐकूनच मी हे करू लागले, असं पूनम सांगते. मी हळूहळू शहाणी होत आहे. वादातून मिळणारी प्रसिद्धी 15 मिनिटांचीच असते हे मला लक्षात आलं.

इरॉटिक व्हिडीओ बनवून पैसे कमवते पूनम 

पूनम जेव्हा इंडस्ट्रीत आली तेव्हा तिने अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले पण तिला इथे काही खास ऑफर्स मिळाल्या नाहीत. यानंतर पूनमने मॉडेलिंगद्वारेच पैसे कमावण्यास सुरुवात केली.

हळूहळू सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोअर्स वाढू लागली. आता ती अडल्ट व्हिडिओ बनवून पैसे कमवते. लॉकअप शो दरम्यान पूनम म्हणाली होती की, लोक काय म्हणतात याची तिला पर्वा नाही, तिला तिचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगायला आवडतं.

पूनम पांडेने स्वतः चर्चेत राहण्यासाठी प्रयत्न करते. असाच प्रयत्न तिने वेबसाइट हॅक झाल्याच सांगून केला. पूनम पांडेने सांगितलं की, माझी वेबसाइट हॅक झाली आहे. तिथे पॉर्न फोटोज अपलोड करण्यात आले आहेत. याचा फायदा असा झाली की, कळत नकळत पूनमची वेबसाइट सर्च झाली.