लग्नातून मिळालेल्या दु:खामुळे पुनम पांडेला घ्यावा लागला कठीण निर्णय 

 पूनम पांडे सध्या लग्नाच्या कठीण टप्प्यातून जात आहे. 

Updated: Jan 13, 2022, 03:01 PM IST
लग्नातून मिळालेल्या दु:खामुळे पुनम पांडेला घ्यावा लागला कठीण निर्णय  title=

मुंबई : 2020 सप्टेंबरमध्ये प्रियकर सॅम बॉम्बेसोबत लग्न करणारी पूनम पांडे सध्या लग्नाच्या कठीण टप्प्यातून जात आहे. तिने पतीविरुद्ध शारीरिक छळाची तक्रार दाखल केली होती. आता अभिनेत्रीने सॅमपासून वेगळं झाल्याबद्दल खुलासा केला आणि तिच्यावर उपचार सुरू असल्याचा खुलासा केला.

5 वर्ष करणार नाही डेट
अलीकडेच, एका मुलाखतीमध्ये पूनम पांडे म्हणाली, 'मी खूप चांगलं काम करत आहे. मी सध्या उपचार घेत असल्याने सॅम बॉम्बेबद्दल मला जास्त बोलायचं नाही. मी एका थेरपिस्टकडे जात आहे. ती पुढे जाऊन दुसऱ्या कोणाला डेट करणार का असा प्रश्न तिला विचारला असता ती म्हणाली, 'नाही, अजिबात नाही. कदाचित आजपासून पाच वर्षांनंतर,  मात्र सध्या मी निश्चितपणे कोणाशीही डेटिंग करण्याचा विचारही करू शकत नाही.'

पतीवर आहेत या केस
पूनमने 8 नोव्हेंबर 2021 रोजी तिचा पती सॅम बॉम्बे विरुद्ध मारहाण आणि छळाचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. याआधी लग्नानंतर काही महिन्यांनी पूनमने सॅम बॉम्बे विरोधात शारीरिक छळाची तक्रार दाखल केली होती. त्याच्यावर आयपीसीच्या कलम ३२३, ३५४, ५०४ आणि ५०६ (ii) अंतर्गत आरोप करण्यात आले होते.

काहि महिन्यांपूर्वी पूनम आणि सॅम पुन्हा एकदा चर्चेत आले होते. पूनमने सॅमविरुद्ध दुसरी तक्रार दाखल केली, कारण याआधी सॅमने तिच्यावर हल्ला केला होता आणि तिच्या डोक्यावर, डोळ्यावर आणि कानाला काही जखमा झाल्या होत्या. या संदर्भात सॅमला मुंबई पोलिसांनी नोव्हेंबरमध्ये अटक केली होती.