बोनी कपूर यांना दुबई सोडण्यास पोलिसांची मनाई

अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव भारतात आणण्यासाठी अजूनही परवानगी मिळालेली नाही.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 27, 2018, 12:14 PM IST
बोनी कपूर यांना दुबई सोडण्यास पोलिसांची मनाई title=

दुबई : अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव भारतात आणण्यासाठी अजूनही परवानगी मिळालेली नाही.

मृत्यूबाबत कसून चौकशी

श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर त्यासंबंधित अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. दुबई फॉरेंसिक डिपार्टमेंटने यामध्ये कोणताही कट नसल्याचं म्हटलं आहे पण पब्लिक प्रॉसिक्यूशन ऑटोप्सी रिपोर्टने संतुष्ट दिसत नाही. पब्लिक प्रॉसिक्यूशनने त्या हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज मागवलं आहे.

दुबई सोडण्य़ास मनाई

श्रीदेवी यांच्या मृत्यू प्रकरणात बोनी कपूर यांची चौकशी सुरु आहे. गल्फ न्यूजच्या माहितीनुसार बोनी कपूर यांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर बोनी कपूर यांना दुबई सोडण्य़ास मनाई करण्यात आली आहे.

मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात 

बॉलिवूडची सूपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनाने सगळ्यांच चांगला धक्का बसला आहे. पण आता त्यांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढत चाललं आहे. या संपूर्ण घटनेत असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. ज्यामुळे श्रीदेवींचा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.