'पावरी हो रही है' गर्ल अडकली लग्नबंधनात, समोर आलेले फोटो पाहून ओळखणंही झालं कठिण

दनानीरने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गोल्डन लेहेंग्यात दनानीर तिचा पती मियांसोबत छान दिसत होती. 

Updated: Oct 29, 2023, 04:30 PM IST
'पावरी हो रही है' गर्ल अडकली लग्नबंधनात, समोर आलेले फोटो पाहून ओळखणंही झालं कठिण title=

मुंबई : ये हम हैं...ये हमारी कार है...और ये पावरी हो रही है... तुम्हाला या ओळी नक्कीच आठवत असतील. अशा प्रकारचा व्हायरल कंटेंट कोणी कसा विसरू शकेल? पाकिस्तानमधील एका व्लॉगरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती त्याच ओळी बोलताना दिसली आणि या व्हिडिओने सोशल मीडियावर असा कहर केला की, या व्हिडीओला व्हूजचा पूर आला आणि 'पावरी हो रही है' हा व्हिडीओ सोशल मीडियावर रातोरात व्हायरल झाला. आता ताजे अपडेट म्हणजे 'पवारी हो रही है' गर्ल दनानीर मुबीन हिचं लग्न झालं आहे.

दनानीरने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गोल्डन लेहेंग्यात दनानीर तिचा पती मियांसोबत छान दिसत होती. तिच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या लग्नाचे फोटो पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पावरी गर्ल या फोटोंमध्ये खूप खुस दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दनाच्या फोटोंवर चाहते खूप छान कमेंट करत आहेत. तिच्या एका जवळच्या मैत्रिणीने लिहिलं की, तुम्ही दोघंही खूप क्यूट दिसत आहात... हे स्वप्नापेक्षा कमी नाही. तर एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं की, ये हम हैं... ये हमारा हसबंण्ड है और ये पावरी हो रही है.... तर एकाने लिहिलं, तू अप्सरासारखी दिसतेस. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मेहंदीपासून हळदी आणि रिसेप्शनपर्यंत चाहत्यांना माहिराचा प्रत्येक लूक खूप आवडला.  

माहिरा भारतात खूप लोकप्रिय आहे आणि आता पाकिस्तानी कलाकारांनाही भारतात काम करण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. काही काळापूर्वी पाकिस्तानमधील दाननीर मुबीन या मुलीचा पावरी हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.  आता तिचा ब्राइडल लूकही सोशल मीडियावर खूप लक्ष वेधून घेत आहे.  दाननीरने तिचे हे सुंदर फोटो तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत.  पांढऱ्या आणि लाल रंगाचं कॉम्बिनेशन करुन दनानीरने लग्नाचा हा लूक पुर्ण केला आहे.