मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता पवन कल्याणचा आज वाढदिवस आहे. पवन कल्याणचा जन्म 2 सप्टेंबर 1971 रोजी आंध्र प्रदेशातील बपतला येथे झाला. पवन आपल्या दमदार अभिनयानं आणि अनेक उत्कृष्ट चित्रपटांनी 'पॉवर स्टार' म्हणून ओळखला जातो. पवन कल्याणचं खरं नाव कोन्निडेला कल्याण बाबू आहे. पवन कल्यान हा साऊथचे मेगास्टार चिरंजीवीचा यांचा धाकटा भाऊ आहे. पवन कल्याणनं केवळ सिनेजगतातच नव्हे तर राजकीय विश्वातही आपले नाव कमवून जनतेची प्रशंसा मिळवली आहे. 'पॉवर स्टार' पवन कल्याणच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.
पवन कल्याण केवळ त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. पवन कल्याणनं तीन लग्न केली आहेत. पवनचं पहिलं लग्न 1997 मध्ये नंदिनीसोबत झालं होतं, त्यानंतर 2007 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर पवननं 2009 मध्ये रेणू देसाईसोबत लग्न केलं, पण हे नातेही फार काळ टिकलं नाही आणि 2012 मध्ये दोघेही विभक्त झाले. यानंतर पवन कल्याणचं तिसरं लग्न 2013 मध्ये अन्ना लेजनेवासोबत झालं आणि दोघे आजही आनंदात आहेत.
I salute to my Nation & my Heartfelt gratitude to our freedom fighters for their supreme sacrifices.@AmritMahotsav #HarGharTiranga pic.twitter.com/7AcVh8e5OR
— Pawan Kalyan (@PawanKalyan) August 15, 2022
पवन कल्याणनं 1996 साली 'अक्कादा अम्माई इक्कादा अब्बाई' या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पवननं त्याच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले, जे एकीकडे प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरले, तर दुसरीकडे या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई देखील केली. पवन कल्याण हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील पॉवर स्टार अभिनेता आहे, त्यामुळे हिंदी प्रेक्षकांनी त्याचे चित्रपट कमी पाहिले असतील.
पवन हा तेलुगू चित्रपटसृष्टीतील बड्या स्टार्सपैकी एक आहे. caknowledge.com च्या अहवालानुसार, पवन कल्याणची एकूण संपत्ती सुमारे $15 दशलक्ष, म्हणजे सुमारे 113 कोटी रुपये आहे. अहवालानुसार, पवन कल्याण दर महिन्याला सुमारे 1 कोटी रुपये कमावतो, ज्यामध्ये ब्रँड एंडोर्समेंट, इव्हेंट्स इत्यादींचा समावेश होतो. एका चित्रपटासाठी त्याची फी सुमारे 10 कोटी रुपये आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे Audi Q7, Mercedes-Benz G55 AMG आणि Mercedes-Benz R-Class सारख्या लक्झरी कार देखील आहेत.