मुंबई : 'कसोटी जिंदगी' या मालिकेतील अनुराग ही भुमिका साकरलेल्या पार्थ समथाने आज ११ मार्चला रोजी आपला वाढदिवस मोठ्या थाटात सेलिब्रेट करत आहे. पार्थ समथानने 'प्यार तूने क्या किया', 'कसौटी जिंदगी के' 'ये है आशिकी' अश्या बऱ्याचं मालिकांमधून अभिनय करत आपली ओळख निर्माण केली. पार्थ समथानने करिअरच्या सुरुवातीच्या काळात अभिनेत्री दिशा पटनीला डेट केल असल्याचं समोर येत आहे.
एका रिपोर्टनुसार, मॉडलिंग क्षेत्रात सुरुवातीच्या काळात जवळजवळ १ वर्ष दिशाने पार्थला डेट केलं होतं. दोघांचे काही फोटो अजूनही सोशल मीडियावर आहेत. पार्थ आणि दिशाने २०१३ साली एकमेकांना डेट केलं होतं. त्यावेळी, दिशा मॉलेडिंग क्षेत्रात होती. बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याआधी दिशा पार्थला डेट करत होती.
एका रिपोर्टनुसार या दोघांच्या नात्यामध्ये विकास गुप्ता आला होता. पार्थ समनाथचं नाव विकास गुप्तासोबत जोडलं जावू लागलं. एकता कपूरने देखील या दोघांच रिलेशन मान्य केलं होतं. दिशाला हे कळताच ती पार्थ पासून दूर झाली. दिशा-पार्थचं नातं फार काळ टिकलं नाही.
पार्थ समथानने विकास गुप्तावर छेडछाड केल्याप्रकरणी तसचं फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. मिळालेल्या एका मुलाखतीमध्ये पार्थ समथानने सांगितलं की, ''विकासने माझे साडेपाच लाख रुपये थकवले आहेत''. तर दुसरीकडे विकासनेदेखील पार्थवर आरोप-प्रत्यारोप करायला सुरुवात केली. पार्थ समानाथचं नावं 'कसोटी जिंदगी२' या मालिकेतील अभिनेत्री एरिका फर्नांडिजसोबत जोडलं जावू लागलं. एरिका आणि पार्थनं 'कसौटी जिंदगी २' या मालिकेत एकत्र काम केलं होतं.या मालिकेत एरिकाने प्रेरणाची भूमिका साकारली होती.