भीषण अपघातात अभिनेत्यानं गमावला जीव; कसा वाचला बाजुलाच बसलेल्या गर्लफ्रेंडचा जीव?

जीवापाड प्रेम केलं, त्याचा डोळ्यादेखत मृत्यू; अपघातातून बचावलेल्या अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडची करुण व्यथा   

Updated: Feb 16, 2022, 01:48 PM IST
भीषण अपघातात अभिनेत्यानं गमावला जीव; कसा वाचला बाजुलाच बसलेल्या गर्लफ्रेंडचा जीव? title=

मुंबई : आपण ज्या व्यक्तीवर निस्वार्थपणे प्रेम करतो... त्याचा डोळ्यादेखत मृत्यू पाहिल्यानंतर त्या व्यक्तीची परिस्थिती कशी असेल... या गोष्टीचा आपण अंदाज देखील लावू शकत नाही. मंगळवारी  पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा दिल्ली सीमेजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. दीप जेव्हा दिल्लूहून पंजाबच्या दिशेने परतत होता तेव्हा ही दुर्दैवी घटना घडली.

महत्त्वाचं म्हणजे दीपसोबत त्यावेळी गर्लफ्रेंड रीना राय देखील होती. अपघातात रिना किरकोळ जखमी झाली आहे. पण अभिनेत्यांचा मात्र मृत्यू झाला. यामुळे अनेकांनी दीपचा झालेला अपघात एक कट असल्याचा दावा केला आहे. 

प्रजासत्ताक दिन 2021 रोजी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारप्रकरणी पंजाबी अभिनेता दीप सिद्धूला अटक करण्यात आली होती. 

याप्रकरणी दीपचं अनेक राजकारणी पक्षांसोबत वाद असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे हा अपघातनसून दीपविरोधात रचलेला कट असल्याचा दावा अभिनेत्याच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहे.

आता दीप सिद्धूच्या कारचा अपघात नक्की कसा झाला, याप्रकरणी फॉरेन्सिक चौकशी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातानंतर रीना म्हणाली, 'जेव्हा अपघात झाला तेव्हा मी झोपली होती, कार आणि ट्रकची धडक झाली तेव्हा जोरदार आवाज झाला...'

पंजाबी अभिनेत्याचा भयंकर अपघातात मृत्यू, गाडीचा चक्काचूर

'तेव्हा दीप रक्ताच्या थारोळ्यात पडला... असल्याचं मी पाहिलं... अशी माहिती त्याच्या गर्लफ्रेडने दिली आहे... काही दिवसांपूर्वी रीना अमेरिकेतून परतली आहे. तिच्यावर सध्या दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

काय म्हणाले पोलीस?
एसपी राहुल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप सिद्धूचं शवविच्छेदन झाल्यानंतर, त्याचं देह कुटुंबाकडे सोपावण्यात आलं आहे. शिवाय ट्रक मालक आणि अज्ञात चालका विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. 

महत्त्वाचं म्हणजे कारमध्ये पोलिसांच्या हाती दारूची बाटली लागली आहे. त्यामध्ये दारू देखील कमी होती... पण घडलेलं प्रकरण ड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह आहे की नाही... यासंदर्भात रिपोर्ट अद्याप आले नसल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.