घटस्फोटानंतर पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार शाहरुखची 'ही' हिरोईन

शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करुन घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. समोर आलेल्या बातमीनंतर तिचे चाहते प्रचंड खूष असल्याचं दिसत आहे. 

Updated: Aug 17, 2023, 09:06 PM IST
घटस्फोटानंतर पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार शाहरुखची 'ही' हिरोईन title=

मुंबई : शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करुन घराघरात पोहचलेली अभिनेत्री माहिरा खान सध्या खूप चर्चेत आहे. आणि ही चर्चा तिच्या लग्नाची आहे. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान लवकरच तिचा बॉयफ्रेंड सलीम करीमसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माहिरा या वर्षी सप्टेंबर महिन्यात लग्न करणार  आहे. याआधी अभिनेत्रीचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर माहिरा लग्न करणार असल्याच्या बातम्या सध्या जोरदार चर्चेत आहेत. अनेक दिवस तिचे चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. 

पुढील महिन्यातच ती तिच्या प्रियकर सलीमसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. असंही म्हटलं जातंय की, पाकिस्तानातील पंजाबमधील एका हिल स्टेशनवर लग्नसमारंभ पार पडेल. ज्यामध्ये तिचे जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित राहणार आहेत. तिच्या लग्नाच्या चर्चेवर अभिनेत्रीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण अनेक प्रसंगी माहिरा सलीमसोबत स्पॉटही झाली आहे. सलीमबद्दल सांगायचं झालं तर तो प्रसिद्ध बिझनेसमन आहे.  

काही दिवसांपुर्वी  माहिरा खान इंस्टाग्रामवर लाईव्हवर आली होती आणि यादरम्यान ती पहिल्यांदाच तिच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलली. तिच्या हमसफर या मालिकेचा संदर्भ देत ती म्हणाली- 'हमसफरमध्ये एक ओळ आहे, जी मला खूप सुंदर वाटली, जिथे आशर खिरदला म्हणतो, 'तुम्ही माझ्यावर कोणती मेहरबानी केली हे मला माहीत नाही, मीही तशीच आहे. मला असं वाटतं.'

सलीम हा एक प्रसिद्ध बिझनेसमन आहे
एका रिपोर्टनुसार माहिरा खान दुसऱ्यांदा लग्नासाठी तयार असल्याचा दावा करण्यात आला आहे.  2019 मध्ये, माहिरा आणि सलीमबद्दल अशा बातम्या आल्या होत्या की दोघांनी तुर्कीमध्ये एंगेजमेंट केली आहे.

माहिराच्या लग्नावर मॅनेजरची प्रतिक्रिया
सप्टेंबरमध्ये माहिराने तिचा प्रियकर सलीमसोबत लग्न केल्याच्या बातमीबाबत तिची मॅनेजर अनुशे तल्हा खानची प्रतिक्रिया समोर आली आहे. जिओ वेबनुसार, जेव्हा अनुषीला माहिराच्या लग्नाच्या अफवांवर विचारण्यात आलं तेव्हा तिने या बातम्यांना 'बेजबाबदार पत्रकारिता' असं म्हटलं. माहिराने कोणतीही प्रतिक्रीया नं देता ही बातमी पसरवली जाते असल्याचं अनुषी यांनी सांगितलं.

शाहरुख खानच्या रईस या चित्रपटात माहिराने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती आणि या सिनेमात झळकल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये अजून काम करायची ईच्छाही व्यक्त केली होती. आता सतत चर्तेत येणाऱ्या अभिनेत्रीच्या लग्नाच्या बातम्यामुळे माहिरा खरंच लग्नबंधनात अडकणार आहे की, ही केवळ अफवा आहे हे येणारा काळच ठरवेल.