Oscar 2023 The Elephant Wispers and Natu Natu : ऑस्कर 2023 मध्ये भारतानंच एक खास छाप सोडली आहे. तीन कॅटेगरीत नॉमिनेशन मिळाल्यानंतर दोन कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळावल्यानंतर भारताचं नावं केलं आहे. 'द एलिफेंट विस्पर्स' (The Elephant whisperers ) या माहितीपटाला बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्ममध्ये पुरस्कार मिळाला आहे. RRR या चित्रपटातील 'नाटू नाटू' (Natu Natu) गाण्याला ओरिजनल सॉंग या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला. या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळवल्यानंतर म्यूजिक कम्पोजर एमएम कीरावानी यांनी सगळ्यांना भारतीयांना गर्व होईल असं काम केलं आहे. 'नाटू नाटू' आणि 'द एलिफेंट विस्पर्स' याला पुरस्कार मिळाल्यानंतर फक्त नेटकरीच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
'द एलिफेंट विस्पर्स' या चित्रपटाला शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की 'गुणीत मोंगा आणि ‘The Elephant Whisperers’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमला या सन्मानासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांनी केलेल्या कामानं शाश्वत विकास आणि निसर्गाचा समतोल राखण्याचे महत्त्व उत्तम पद्धतीनं दाखवले आहे.'
Congratulations to @EarthSpectrum, @guneetm and the entire team of ‘The Elephant Whisperers’ for this honour. Their work wonderfully highlights the importance of sustainable development and living in harmony with nature. #Oscars https://t.co/S3J9TbJ0OP
— Narendra Modi (@narendramodi) March 13, 2023
राहुल गांधी यांनी या चित्रपटाविषयी कमेंट करत 'कार्तिकी गोन्सालव्हीस आणि गुणीत मोंगा आणि 'द एलिफेंट विस्पर्स' च्या संपूर्ण टीमला ऑस्कर पुरस्कार मिळाल्या बाबतमीत खूप खूप शुभेच्छा! या दोन महिलांनी इतक्या सुंदर पद्धतीनं जंगल आणि जंगलात राहणाऱ्या प्राण्यांचे महत्त्व दाखवतं भारताची मान उंचावली.'
Heartiest congratulations to @EarthSpectrum, @guneetm and the entire team of ‘The Elephant Whisperers' for winning the Oscar.
These two women have made India proud with their heart-warming showcase of the beauty and importance of wildlife conservation. pic.twitter.com/Ckj2oJMTBa
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 13, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 'अपवादात्मक… ‘नाटू नाटू’ गाण्याची लोकप्रियता साऱ्या जगभरात पसरली आहे. हे गाणं पुढील कित्येक वर्षं लोकांच्या स्मरणात राहील. एमएम कीरावानी आणि चंद्रबोस या दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हा सन्मान मिळवण्यासाठी संपूर्ण टीमचे अभिनंदन. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.'
Exceptional!
The popularity of ‘Naatu Naatu’ is global. It will be a song that will be remembered for years to come. Congratulations to @mmkeeravaani, @boselyricist and the entire team for this prestigious honour.
India is elated and proud. #Oscars https://t.co/cANG5wHROt
— Narendra Modi (@narendramodi) March 13, 2023
हेही वाचा : Oscars 2023 : आई, मी ऑस्कर जिंकलो; पुरस्कार सोहळ्यातील अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
The song India danced to has truly gone global!
Congratulations @mmkeeravaani, @boselyricist and the entire RRR team for winning the Best Original Song at the Oscars for #NaatuNaatu. pic.twitter.com/axSEfCJWq9
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 13, 2023
दुसरीकडे कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी या टीमला शुभेच्छा देत म्हटले की 'भारताचं हे गाणं आणि डान्स खरंच ग्लोबली व्हायरल झाला आहे. खूप शुभेच्छा आणि RRR च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा!'