गंभीर आजाराशी झुंज देतेय Will Smith ची पत्नी; ही केसगळती म्हणजे साधासुधा आजार नाही

पती विल स्मिथनं भर ऑस्कर सोहळ्यात व्यक्त केला संताप...   

Updated: Mar 29, 2022, 02:47 PM IST
गंभीर आजाराशी झुंज देतेय Will Smith ची पत्नी; ही केसगळती म्हणजे साधासुधा आजार नाही  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : ऑस्कर 2022 (Oscar 2022) च्या सोहळ्यादरम्यान अभिनेता विल स्मिथ (Will Smith) च्या रागानं मर्यादा ओलांडली आणि त्यानं व्यासपीठावर जात पत्नीची खिल्ली उडवणाऱ्या Host क्रिस रॉक याच्या कानशिलात लगावली. 

विलची पत्नी जेडा पिंकेट स्मिथ (Jada Pinkett Smith) हिच्या मुंडन करण्यावरून तिची खिल्ली उडवली गेली होती. जेडा एलोपीसिया (Alopecia) नावाच्या केसगळतीच्या आजाराला झुंज देत आहे. 

एलोपीसिया (Alopecia) म्हणजे काय ? 
एलोपीसिया (Alopecia) किंवा Alopecia Areata एक कॉमन ऑटोइन्म्यून परिस्थिती आहे. यामध्ये पीडित व्यक्तीचे केस गळण्यास सुरुवात होते. यामध्ये सुरुवातीला कपाळावरी केस गळण्यास सुरुवात होते. 

काही लोकांमध्ये या आजाराचं प्रमाण इतकं दिसून येतं की त्यांच्या डोक्यावरचे सर्वच केस कळून जातात. 

जेडा यावर मोकळेपणानं म्हणते... 
2018 मध्ये एका मुलाखतीदरम्यान जेडानं तिच्या या आजावर मोकळ्या मनानं वक्तव्य केलं होतं. 

'बरेचजण मला विचारत आहेत की मी पगडी का घालतेय? मी यावर आतापर्यंत काही बोलले नाहीये, कारण बोलणं सोपं नाहीये. एकदा मी अंघोळ करत होते आणि अचानक माझे मुठभर केस निघाले. मला टक्कल पडतंय का? मी विचार करु लागले. 

माझ्या आयुष्यातले हे असे क्षण होते जेव्हा माझा थरकाप उडाला होता. म्हणून मी केस कापले. तेव्हापासून आतापर्यंत मी केस कापत आले आहे', असं ती म्हणाली. 

आपल्याला Alopecia हा आजार असल्याचं तिनं 2021 मध्ये सांगितलं. यासाठी आपण उपचार घेतही असल्याचं तिनं स्पष्ट केलं. यामुळं तिला थोडाफार आराम मिळाला, पण हा आजार पूर्णपणे बरा झाला नाही.