This Actress Never Had Money to Pay the Rent and Now the Owner of 2700 Cr : 60 च्या दशकात अभिनेत्री शर्मिला टागोर या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी त्यावेळच्या अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलं. इतकंच नाही तर त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देखील दिले. एक वेळ अशी होती जेव्हा त्यांच्याकडे घर भाडं देण्यासाठी पैसे नव्हते तर आज त्या 2700 कोटींच्या संपत्तीच्या मालकीण आहेत. शर्मिला टागोर यांनी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले जे बॉक्स ऑफिसवर टॉपचे ठरले. त्यांच्या 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आराधना' या चित्रपटानं सगळ्यांचे लक्ष वेधले होते. आता तर त्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील आल्या आहेत. त्यांचा गुलमोहन हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. मात्र, एक काळ असा होता जेव्हा त्यांच्याकडे घर भाडं देण्यासाठी पैसे नव्हते.
शर्मिला यांनी अमर प्रेम, अनुपमा, एन इवनिंग इन पॅरिससारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. इतकंच नाही तर त्या 13 वयाच्या होत्या तेव्हा त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मात्र, काही काळात शर्मिला टागोर यांची लोकप्रियता इतकी वाढली की त्यांचा समावेश हा सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये आलं. या दरम्यान, सगळ्यात जास्त ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये शर्मिला यांचं नाव घेण्यात आलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज शर्मिला या 2700 कोटींच्या संपत्तीच्या मालकीण आहेत.
दरम्यान, इतकी संपत्ती असली तरी देखील शर्मिला या कंजूस असल्याचं त्यांची लेक सोहा अली खाननं एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्या मुलाखतीत तिनं सांगितलं की पतौडी पॅलेसमध्ये शर्मिला टागोर या रंगकाम करत नसून पॅच पेन्टिंग किंवा व्हाईटवॉश करतात. त्याचं कारण म्हणजे त्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत नाही. बऱ्याच काळापासून पतौडी पॅलेसमधून काहीच नवीन बनवलं नाही कारण आर्किटेक्चर आजही सुंदर आहे.
हेही वाचा : राहा कपूरच्या वाढदिवसानिमित्तानं नीतू कपूर आणि रिद्धिमानं शेअर केली Unseen फोटो
शर्मिला यांचे अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मात्र, त्यातही त्यांचा 1969 मध्ये राजेश खन्ना यांच्यासोबत प्रदर्शित झालेला आराधना हा चित्रपट आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. त्यांचे चित्रपट हे जवळपास 50 आठवडे चित्रपटगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळायचे.