Samantha च्या आयटम साँगवर प्रेग्नेंट Bharti Singh चा बोल्ड डान्स, व्हिडिओ व्हायरल

'पुष्पा' हा चित्रपट सध्या सर्वांच्या हृदयावर राज्य करत आहे.

Updated: Jan 27, 2022, 05:58 PM IST
 Samantha च्या आयटम साँगवर प्रेग्नेंट Bharti Singh चा बोल्ड डान्स, व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : 'पुष्पा' हा चित्रपट सध्या सर्वांच्या हृदयावर राज्य करत आहे. ज्याने हा चित्रपट पाहिला आहे तो या सिनेमाचे कौतुक करताना थकत नाहीये.

त्याचबरोबर या सुपरहिट चित्रपटातील 'ओ अंतवा' हे गाणं देखील हिट ठरलं आहे. इंटरनेटवर या चित्रपटातील गाण्यांची चांगलीच चलती आहे. दक्षिण भारतीय अभिनेत्री समंथा अक्किनेनीवर या सिनेमातील ओ अंतवा हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच पुष्पाच्या प्रेमात आहेत..

नेहा कक्करपासून ते उर्फी जावेदपर्यंत अनेक स्टार्स आहेत ज्यांनी 'ओ अंतवा.. गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडिओ शेअर केले आहेत. त्याचबरोबर या एपिसोडमध्ये कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लांबाचिया यांचीही नावं जोडली गेली आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

गरोदरपणात भारती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. आता अलीकडेच कॉमेडियनने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हर्ष आणि ती समंथाच्या 'ओ अंतवा'वर सेक्सी डान्स करताना दिसत आहेत. या गाण्यात अल्लू अर्जुनला आकर्षित करताना समंथाने ज्या प्रकारे परफॉर्म केले होते. 

त्याचप्रकारे भारती तिच्या पतीसोबत डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे.