Maharashtrachi Hasya Jatra :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या प्रेक्षकांना मोठा धक्का! प्रसिद्ध कलाकार शोचा निरोप घेणार

Maharashtrachi Hasya Jatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधल्या 'या' कॉमेडीयनने अचानक शो का सोडला? असं काय झालं की त्याला शो अर्ध्यातचं सोडावा लागला?

Updated: Oct 28, 2022, 02:53 PM IST
Maharashtrachi Hasya Jatra :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या प्रेक्षकांना मोठा धक्का! प्रसिद्ध कलाकार शोचा निरोप घेणार title=

मुंबई : Maharashtrachi Hasya Jatra महाराष्ट्राची हास्यजत्रा शो सध्या संपुर्ण महाराष्ट्राला खळखळवून हसवत आहे. या शोमधील कलाकारांच्या उत्कृष्ट कॉमेडीमुळे शोचा प्रेक्षक वर्ग प्रचंड वाढला आहे. या प्रेक्षक वर्गासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasya Jatra) शोमधील एक कॉमेडियन शोचा निरोप घेणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राची हास्यजत्राच्या प्रेक्षकांना मोठा धक्का बसणार आहे. दरम्यान हा कलाकार कोण आहे? व त्याच शो सोडण्यामागचं कारण काय? हे जाणून घेऊयात.  

महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasya Jatra) शोमध्ये असे अनेक कॉमेडी कलाकार आहेत, ज्यांनी स्वत:च्या उत्कृष्ट कॉमेडी अभिनयाच्या बळावर मोठं नाव केलं आहे. या कलाकाराचे नाव ओंकार भोजने (Onkar Bhojane) आहे. ओंकार भोजने हा उत्कृष्ट अभिनेता आणि कॉमेडी कलाकार आहेत. ओंकार महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचा निरोप घेणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसणार आहे. 

'या' शोमध्ये एन्ट्री मारणार 

ओंकार भोजनेने (Onkar Bhojane) महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasya Jatra) या शोमधून प्रेक्षकांना खळखळवून हसवले आहे. आता तो पुन्हा एकदा नव्या शोमधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करताना दिसणार आहे. ओंकार महाराष्ट्राची हास्यजत्रामधून बाहेर पडणार असून फू बाई फू च्या नव्या पर्वातून प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहे. दरम्यान 9 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आता पुन्हा एकदा फू बाई फू हा कार्यक्रम झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.  

फू बाई फू (Fu Bai Fu) या शोमध्ये ओंकार एन्ट्री मारणार आहे. या शोमध्ये ओंकार (Onkar Bhojane) त्याची हास्याची जादू कायम राखतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

दरम्यान ओंकार (Onkar Bhojane) शोमधून बाहेर पडणार असल्याची माहिती एक सोशल मीडिया पेजवरून देण्यात आली आहे. मात्र यावर अद्याप ओंकारकडून (Onkar Bhojane) आणि वाहिनीने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही आहे.