Official married sid-kiara : सिद्धार्थ आणि कियारा अखेर अडकले विवाहाच्या बंधनात, दोघेही...

Sidharth Malhotra-Kiara Advani wedding : जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये अतिशय धुमधडाक्यात हा विवाह सोहळा संपन्न झाला आहे

Updated: Feb 7, 2023, 07:18 PM IST
Official married sid-kiara :  सिद्धार्थ आणि कियारा अखेर अडकले विवाहाच्या बंधनात, दोघेही... title=

Sidharth Malhotra-Kiara Advani wedding : सिद्धार्थ कियाराचं अखेर लग्न लागलं आहे. सप्तपदी घेत दोघांनीही नवरा बायको म्हणून आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचं वचन घेतलं आहे. 

Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding Update: bahucharchit सिद्धार्थ आणि कियाराचं लग्न अखेर संपन्न झाल आहे ,  'शेरशाह' चित्रपटातील आपल्या केमिस्ट्रीने देशभरातील चाहत्यांना खूश करणारे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी (Sidharth Malhotra, Kiara Advani’s wedding) आज (February 7) अखेर लग्नबंधनात अडकले आहेत . राजस्थान येथील सूर्यगड पॅलेसवर (Suryagarh Palace) सिद्धार्थ आणि कियारा यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नसोहळ्याला जैसलरमेरला पोहचले आहेत. करण जोहर, मीरा राजपूत, शाहिद कपूर शबीना खानसह अनेक सेलिब्रिटी सूर्यगड पॅलेसमध्ये उपस्थित आहते. इशा अंबानी आणि आनंद परिमल देखील काळ राजस्थानला पोचले आहेत. त्यांच्या लग्नाच्या (Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding) समारंभाचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीयेत. चाहत्यांना कियारा आणि सिद्धार्थला  लग्नाच्या  आऊटफिटमध्ये  पाहण्याची  प्रचंड  उत्सुकता आहे. 

माहितीनुसार  सिद्धार्थ आणि कियारा यांनी लग्नासाठी सिल्व्हर रंगाचे आऊटफिट परिधान केले होते. 
दोघेही अतिशय देखणे दिसत होते.

 सिद्धार्थने लग्नात खास एन्ट्री घेतली होती.  'साजन जी घर आए'  या सुपरहिट गाण्यावर डान्स करत सिद्धार्थ लग्नमंडपात पोहचला. 

कियारा सिद्धार्थचं खास पंजाबी स्टाईलने लग्न लागलं.  वरातीसाठी थेट दिल्लीतून बॅंडवाले बोलावण्यात आले होते.

यावेळी कियारा आणि सिद्धार्थने सिल्व्हर कलरचे आऊटफिट परिधान केले होते