कोलकाता न्यायालयाने नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचा विवाह ठरवलाय बेकायदेशीर

नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचा विवाह कोलकाता न्यायालयाने अवैध ठरवला आहे.

Updated: Nov 17, 2021, 09:54 PM IST
कोलकाता न्यायालयाने नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचा विवाह ठरवलाय बेकायदेशीर  title=

मुंबई : काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचा विवाह कोलकाता न्यायालयाने अवैध ठरवला आहे.  एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता येथील न्यायालयाच्या नियमांनुसार नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचा विवाह कायदेशीररित्या वैध नाही. या वर्षाच्या सुरुवातीला नुसरत जहाँने निखिलशी तिचा विवाह भारतीय कायद्यानुसार वैध नसल्याचं विधान करून लोकांना आश्चर्यचकित केलं होतं.

नुसरत जहाँ अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. निखिल जैनसोबत आधी लग्न आणि नंतर आई झाल्याच्या बातम्यांसोबतच नुसरत निखिलसोबतचं लग्न मोडल्याच्या आणि त्यानंतर अभिनेता यश दासगुप्तासोबत अफेअर असल्याच्या बातम्यांनंतर बराच काळ चर्चेत होती. ऑगस्टमध्ये नुसरतने एका मुलाला जन्म दिला. ज्याचं यश दासगुप्ताने वडिलांचं नाव ठेवलं. या बातमीनंतर नुसरत जहाँचे संदूरसोबतचे फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. त्यानंतर लोकांनी यश दासगुप्तासोबतच्या तिच्या लग्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

नुकतंच लग्नाच्या वादावर मौन तोडत नुसरत जहाँने सांगितलं की, त्याने माझ्या लग्नासाठी पैसे दिले नाहीत, हॉटेलचे बिलही दिलं नाही. मला त्याला काही सांगायची गरज नाही, मी प्रामाणिक आहे. मला चुकीच्या पद्धतीने जगासमोर मांडण्यात आलं होतं, पण आता मी सगळं काही साफ केलं आहे, असंही या अभिनेत्रीने म्हटलं आहे. त्याचवेळी यश आणि नुसरतने लग्नाची अधिकृत घोषणा केली नसली तरी या कपलला पाहून असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. त्यांची केमिस्ट्री अप्रतिम आहे.