प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीने लावले गंभीर आरोप; म्हणाली 'माझ्यावर बंदूक...'

 काही काळापूर्वी अभिनेत्याच्या पत्नीने  त्याच्यापासून वेगळं होण्याची घोषणा केली होती.

Updated: Oct 2, 2022, 10:19 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीने लावले गंभीर आरोप; म्हणाली 'माझ्यावर बंदूक...' title=

मुंबई : फिरोज खान हा एक पाकिस्तानचा सुप्रसिद्ध अभिनेता आहे. जो आपल्या व्यावसायिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहतो. मात्र, गेल्या काही काळापासून तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खूप चर्चेत आहे. काही काळापूर्वी अभिनेत्याची पत्नी अलीजेहने त्याच्यापासून वेगळं होण्याची घोषणा केली होती. यासोबतच त्यांच्यावर अनेक आरोपही करण्यात आले होते. दोघांच्या घटस्फोटाशी संबंधित हे प्रकरण कराची न्यायालयात सुरू आहे. दरम्यान, आता अलीजेहने फिरोजवर आणखी एक गंभीर आरोप केल्याची बातमी आहे.

फिरोज बंदुकी दाखवून घाबरवायचा
पाकिस्तानी वेबसाईट गॅलेक्सी लॉलीवूडच्या एका बातमीत म्हटलं आहे की, अलीजेहने कोर्टात फिरोजविरोधात मोठं वक्तव्य केलं आहे. फिरोज आपल्याला मारहाण करायचा, तसंच डोक्यावर बंदूक ठेवून धमकावत असे, असंही तिने म्हटलं आहे.

फिरोज यांनी ही मागणी मान्य करण्यास नकार दिला
रिपोर्ट्सनुसार, अलीजेहने कोर्टात असंही म्हटलं आहे की, तिचा मुलगा एका महागड्या शाळेत जातो, तसंच मुलीच्या देखभालीसाठी खूप पैसा खर्च होतो, जो नोकरी नसल्यामुळे ती पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे मुलांचा सांभाळ करण्यासाठी फिरोजने महिन्याला दोन लाख रुपये द्यावेत. असं तिने न्यायालयात सांगितलं. मात्र, फिरोजने ही मागणी मान्य करण्यास नकार दिल्याचंही अहवालात सांगण्यात आलं आहे. त्याने महिन्याला फक्त 20 हजार रुपये देण्याचं सांगितलं आहे.

चार वर्षांपूर्वी लग्न झालं
हे लक्षात घेण्यासारखं आहे की, फिरोज खान आणि अलीजेह यांनी चार वर्षांपूर्वी 2018 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर दोघंही दोन मुलांचे पालक झाले. मात्र, अचानक घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, या प्रकरणात आणखी काय निष्पन्न होतं, हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे.