'या' अभिनेत्रीला Shehnaaz Gill मुळे मोठ्या प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही काम?

2021 मध्ये रिलीज झालेला 'होंसला राख' या सिनेमात अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत होता.

Updated: Jun 6, 2022, 09:10 PM IST
'या' अभिनेत्रीला Shehnaaz Gill मुळे मोठ्या प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही काम? title=

मुंबई :  2021 मध्ये रिलीज झालेला 'होंसला राख' या सिनेमात अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत होता. आता हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आमि याचं कारण म्हणजेच नुकतंच एका मुलाखतीदरम्यान याविषयी बोलताना Nimrit Kaur Ahluwalia म्हणाली, 'छोटी सरदारनीमध्ये मला 'होंसला राख'ची ऑफर मिळाली होती. दिलजीत सर स्वतः माझ्याशी बोलले. त्यांनी मला इंस्टाग्रामवर मॅसेज पाठवला आणि विचारलं की,  मी एका भागासाठी टेस्ट करेन. त्यांचा मेसेज पाहून मी रडायला लागले.

हेच पात्र शहनाज गिलच्याही पदरी आलं.
विशेष म्हणजे निमृत कौर अहलुवालियाला ज्या भूमिकेसाठी ऑडिशनसाठी विचारण्यात आलं होतं ती भूमिका नंतर शहनाज गिलने केली. निमृत म्हणाली, 'मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही याचं दु:ख होतं. अनेक गोष्टी कामी आल्या नाहीत. कोविड शिखरावर होतं. त्याचवेळी निमृतला कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्या कंपनीचा फोन आला, त्यामुळे ती दिल्लीहून मुंबईत आली होती.

तिथे येऊन तिने एका चित्रपटासाठी ऑडिशन दिलं आणि दिग्दर्शक आणि निर्मात्यांची भेट घेतली. निमृतने सांगितलं की, 'आम्ही पेपरवर्कबद्दल बोललो. त्यांनी मला काही दिवस थांबण्यास सांगितलं. अभिनेत्री पुढे म्हणाली, 'मला वाटलं की हे सगळं खूप सोपं आहे. स्टार किड नसूनही माझ्यासोबत हे घडतंय यावर विश्वास बसत नव्हता. पण त्यांनी मला पुन्हा फोन केला नाही. मी काही दिवस वाट पाहिली, पण पुढे काहीच झालं नाही.

स्टार किडमुळे निमृतला चित्रपट मिळाला नाही
निमृतने सांगितलं की, 'त्या मोठ्या प्रोडक्शन हाऊस आणि दिग्दर्शकाचा चित्रपट पडद्यावर पाहिल्यानंतर मला समजलं की, मला ही भूमिका का मिळाली नाही'. अभिनेत्री म्हणाली, 'आमच्यासारख्या लोकांसाठी हे इतकं सोपं नाही. रोज सकाळी माझी बॅग उचलायते आणि त्यात सगळ्या प्रकारचे कपडे घालून ऑडिशनला जाते. मी मुंबईत फक्त सहा महिने असल्याने रोज ६-८ ऑडिशन्स देण्याचं ध्येय ठेवलं होतं.