देसी गर्ल प्रियंका निक जोनासच्या प्रेमात आकंठ बुडाली

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा निक जोनासच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे.

Updated: Jul 5, 2018, 07:41 PM IST
देसी गर्ल प्रियंका निक जोनासच्या प्रेमात आकंठ बुडाली  title=

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा निक जोनासच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे. त्यामुळेचं तर जिथे निक जाईल तिथे प्रियंका पोहोचतये. प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या प्रेमाची चांगलीच चर्चा रंगू लागलीये. प्रियंका निकला आपल्या आईची भेट करून देण्यासाठी भारतात घेऊन आली होती. पण आता ते दोघं पुन्हा अमेरिकेला गेले आहेत. 

अमेरिकेला परत आल्यानंतर प्रियंका निकसोबत विला मिक्स फेस्टिवलसाठी ब्राझीलला गेली. तिथे प्रियांका निकला त्याच्या परफॉर्मन्सच्या वेळेस चीअर करतांना दिसली. निकच्या परफॉर्मन्सचा एक व्हिडिओ बनवून प्रियंकाने तो इन्स्टाग्रावर शेअर केला आहे.  निकचा फोटो आणि व्हिडिओ शेयर करतांना प्रियंकानं दिलवाली इमोजी टाकली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून या जोडप्याच्या प्रेमाच्या चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.

प्रियंका निकच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे. प्रियांका आणि निकचा साखरपुडा होणार असल्याचीही चर्चा रंगत आहे. आता प्रियंका आपल्या पेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या निक बरोबर कधी लग्न करते याकडं तिच्या चाहत्यांचं लक्ष लागले आहे.