ब्रेकअपनंतर नेहा कक्कडने या अभिनेत्याला केलं प्रपोझ

पाहा हा व्हिडिओ 

 ब्रेकअपनंतर नेहा कक्कडने या अभिनेत्याला केलं प्रपोझ  title=

मुंबई : गायिका नेहा कक्कड गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. त्याला कारण बॉयफ्रेंड हिमांश कोहलीसोबत केलेलं ब्रेकअप. एका कार्यक्रमातून सुरू झालेली ही प्रेमकथा संपली असल्याचं समोर आलं. पण आता नेहाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. 

या व्हिडिओत ब्रेकअपने दुःखी झालेली नेहा एका वेगळ्याच अवतारात दिसत आहे. या व्हिडिओत चक्क नेहाने एका अभिनेत्याला प्रपोझ केल्याचं दिसत आहे. 

नेहाने या व्हिडिओत अभिनेता रणबीर कपूरला प्रपोझ केल्याचं दिसत आहे. नेहा रणबीरला म्हणते की, मी तुला खूप पसंत करते. मी तुला या सगळ्यांसमोर प्रपोझ करत आहे. तू माझ्यासोबत डान्स करणं पसंत करशील का?

नेहाचं हे प्रपोझल ऐकून रणबीर तिला उचलून घेतो. हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जेव्हा नेहा गाण्याच्या रिऍलिटी शो लिटिल चॅम्प्समध्ये जजची भूमिका साकारली आहे. 

थोड्या दिवसांपूर्वीच नेहा कक्कड आणि हिमांश कोहली यांच ब्रेकअप झालं होतं. यामुळे नेहा कक्कड अतिशय दुःखी असल्याचं समोर आलं आहे. नेहा आणि हिमांशने "हमसफर' या व्हिडिओत एकत्र काम केलं होतं.

त्यानंतर या दोघांमधील जवळीक वाढली आणि ओळखीच रुपांतर मैत्रीत आणि मग प्रेमात झालं. त्यानंतर इंडियन आयडलच्या मंचावर हिमांशने नेहाला प्रपोझ केलं होतं. यानंतर सगळं सुरू असताना अचानक एक दिवस नेहा आणि हिमांशने एकमेकांना अनफॉलो केलं.

ब्रेकअपची माहिती देत या दोघांनी एकमेकांच्या अकाऊंटवर शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले आहेत.