सरोगेसी की अडॉप्शन? बाळाला हातात घेण्याआधीच नयनतारा ट्रोलिंगची शिकार

नयनतारा जुळ्या मुलांची आई झाली आहे. 

Updated: Oct 10, 2022, 10:42 AM IST
सरोगेसी की अडॉप्शन? बाळाला हातात घेण्याआधीच नयनतारा ट्रोलिंगची शिकार title=

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार नयनतारा (Nayanthara)आणि तिचा पती विघ्नेश शिवन (Vignesh Shivan) हे आई-वडील झाले आहेत. या जोडप्याने जुळ्या मुलांचे स्वागत केले आहे. विघ्नेश आणि नयनतारानं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या जोडप्यानं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नेटकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, या दाम्पत्यानं सरोगसीची मदत घेतली आहे की मुलांना दत्तक घेतले, अशी चर्चाही ट्विटरवर सुरू आहे.

आणखी वाचा : अजय देवगणला मुलगा युगनं लगावली होती कानशिलात, पाहाताच कुटुंबातील सदस्यांना बसला होता धक्का

ट्विटरवर  #surrogacy हे हॅशटॅग ट्रेंड होत आहे. यावेळी अनेक नेटकऱ्यांनी नयनताराला प्रेग्नंसीशिवाय आई होण्यावर प्रश्न विचारला आहे. भारतात सरोगसीचा उपयोग एक व्यवसाय म्हणून करण्यात येतो, असे अनेकांचे म्हणणे आहे. सेलिब्रिटींनी हा ट्रेंड बनवला आहे. अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की नयनतारा आणि विघ्नेश यांनी सगळ्यात आधी सरोगसी करण्याचा निर्णय घेतला आणि गोष्टी निश्चित झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असेल. नेटकऱ्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर नयनताराचे चाहते त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

बातमीची लिंक : 'ही' जन्म तारीख असणाऱ्या लोकांसाठी ऑक्टोबरचा दुसरा आठवडा असेल शुभ!

नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांनी कोणत्याही कारणास्तव सरोगसीचा निर्णय घेतला असेल, सरोगसीच्या माध्यमातून मुलं झाली असतील किंवा दत्तक घेण्याचा मार्ग स्वीकारला असेल, ही त्यांची मर्जी असल्याचं चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यांना त्यांच्या मुलांचं काय करायचे आहे, ते त्यांच्यावर आहे आणि इतर कोणावर नाही. इतरांनी ते पालक झालेत याचा आनंद असला पाहिजे आणि त्यांच्या निर्णयावर शंका घेऊ नये. (nayanthara becomes mother gets criticized for choosing surrogacy) 

आणखी वाचा : 12 वर्षांनंतर ‘या’ 3 राशींचे उजळेल भाग्य, दिवाळीनंतर 'या' लोकांची लागेल लॉटरी!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : ...म्हणून सुष्मिता सेनला बॉलिवूडमध्ये मिळत नव्हत्या हव्या त्या भूमिका

नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांचं लग्न 9 जून 2022 रोजी चेन्नई येथे झाला. त्यांच्या लग्नाला कुटुंब आणि जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती. याशिवाय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टारही या लग्नात पोहोचले होते. सुपरस्टार्सच्या यादीत सुर्या, शाहरुख खान, विजय सेतुपती, एआर रहमान यांचा समावेश होता. लवकरच नयनताराच्या जीवनावर आधारित नेटफ्लिक्सवर एक चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनेत्रीची प्रेमकहाणी आणि लग्नाबाबत कोणाला माहित नसलेल्या अशा अनेक गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. या चित्रपटात मुलांचाही उल्लेख असू शकतो असे आता म्हटले जात आहे.