Togehther Forever...यंदाच्या वर्षातील बहुप्रतिक्षित सेलिब्रिटी विवाहसोहळा संपन्न; पहिला फोटो आला समोर

महाबलीपुरमच्या लक्झरी रिसॉर्टमध्ये या दोघांचा विवाहसोहळा संपन्न झालाय.   

Updated: Jun 9, 2022, 04:22 PM IST
 Togehther Forever...यंदाच्या वर्षातील बहुप्रतिक्षित सेलिब्रिटी विवाहसोहळा संपन्न; पहिला फोटो आला समोर  title=

मुंबई : अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि विघ्नेश शिवन (vignesh shivans) यांनी अखेर लग्नगाठ बांधलीय. महाबलीपुरमच्या लक्झरी रिसॉर्टमध्ये या दोघांनी सात फेरे घेतले आहेत. या दोघांच्या लग्नाचे फोटो आता समोर आले आहेत. या फोटोत नयनतारा भावूक झाल्याचे दिसून आली होती. यावेळी शिवम तिला सावरतानाही दिसला आहे. सध्या या दोघांचे फोटो प्रचंड व्हायरल होत असून या फोटोंवर शुभेंच्छांचा वर्षाव होत आहे. 

महाबलीपुरमच्या लक्झरी रिसॉर्टमध्ये नयनतारा (Nayanthara) आणि विघ्नेश शिवन  (vignesh shivans) यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. विघ्नेश शिवनने त्याच्या ट्विटर हँडलवर नवरी नयनताराच्या कपाळावर चुंबन घेतलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने 'देवाच्या कृपेने आणि आई-वडील आणि मित्रांच्या आशीर्वादाने मी नयनताराशी लग्न केले आहे, असे कॅप्शन लिहिले आहे. या लग्नाला बॉलिवूडमधील शाहरुख खान आणि बोनी कपूर यांनी हजेरी लावली होती. तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून रजनीकांत, विजय सेतुपती आणि थलपथी विजयसह अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. तसेच निर्माते एटली आणि मणिरत्नम देखील पोहोचले होते.

नयनताराचा लुक 
लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये नवरी नयनतारा खूपच सुंदर दिसत होती. तिने गळयात छान ज्वेलरी घातली होती. तर विघ्नेश शिवन देखील क्रिम कलरच्या सुटमध्ये खुलून दिसत होता. नयनताराच्या या नव्या प्रवासात शाहरुखही तिला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला होता. या लग्नात शाहरूख खूप डॅशिंग दिसत होता. शाहरूखला काही दिवसांपूर्वीचं कोरोना झाला होता. या आजारातून सावरत शाहरूख नयनताराच्या लग्नात पोहोचला होता. शाहरुख 'जवान' चित्रपटात नयनतारासोबत दिसणार आहे.

7 वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न
नयनतारा आणि विघ्नेश शिवन गेल्या 7 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. नयनतारा विघ्नेश शिवनच्या 'ननुम राउदीधन' चित्रपटात काम करत दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. विघ्नेश या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होता. एकत्र काम करत असताना नयनतारा आणि विघ्नेश प्रेमात पडले आणि डेटींग करू लागले. नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांची 2021 मध्ये एंगेजमेंट झाली.