राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीची बाजी

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

Updated: Aug 9, 2019, 05:03 PM IST
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीची बाजी title=

नवी दिल्ली: दिल्लीच्या शास्त्री भवन येथे शुक्रवारी ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी 'भोंगा' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. 

तर 'नाळ' या चित्रपटातील श्रीनिवास पोकळे सर्वोत्कृष्ट बालकलाकार ठरला आहे. पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून 'नाळ' चित्रपटाच्या सुधाकर रेड्डी यांची निवड झाली आहे.

स्वानंद किरकिरे यांना 'चुंबक' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 'खरवस' सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला आहे.

पर्यावरण संवर्धनावर आधारित 'पाणी' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

हिंदीमधील 'अंधाधून' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. विकी कौशल आणि आयुषमान खुराना यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून किर्थी सुरेशची निवड झाली आहे.