Nandamuri Balakrishna : तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता नंदमुरी बालकृष्ण त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात. ते त्यांच्या हटके अॅक्शनसाठी नेहमीच चर्चेत असतात. अभिनयासोबत नंदमुरी हे राजकारणात देखील सक्रिय आहेत. नंदमुरी गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अंजलीला धक्का देण्यामुळे चर्चेत होते. अशात आज त्यांचा 64 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या चर्चेत राहिलेल्या वादांविषयी जाणून घेऊया.
नंदमुरी बालकृष्णचं जन्म 10 जून 1960 ला चेन्नई मध्ये झाला. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये दर्जेदार काम केलं आहे. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात वयाच्या 14 व्या वर्षी केली. त्यानं पहिल्यांदा 1974 मध्ये ‘ततम्मा कला’ मध्ये बालकलाकार म्हणून काम केलं. चित्रपटात दशकांपर्यंत काम केल्यानंतर त्यानं राजकारणात प्रवेश केला. नंदमुरी यांचे वडील एनटी रामाराव हे आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री होते.
नंदमुरी यांनी 2016 मध्ये महिलांविषयी अश्लील कमेंट केली होती. त्यावरून त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल झाली होती. त्यानंतर तेलुगू देसम पार्टीनं या प्रकरणात एक स्टेटमेंट जारी केलं होतं आणि बालकृष्ण यांना त्यांच्या वक्तव्याविषयी खेद आहे आणि त्यासाठी ते माफी मागत आहेत.
नंदमुरी यांनी एका चाहत्याला कानशिलात लगावली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. 2017 मध्ये पक्षाचा प्रचार करण्यासाठी गेले होते तेव्हा एक चाहता हा सेल्फी घेण्यासाठी आला आणि तेव्हा नंदमुरी यांनी कानशिलात लगावली. त्यानंतर पुन्हा एकदा 2021 मध्ये चाहत्याला कानशिलात लगावली होती.
2004 मध्ये त्यांचं नाव एका वेगळ्या घटनेत अडकले होता. त्यांची पत्नी वसुंधरा देवीच्या नावानं रजिस्टर रिवॉल्वरचा वापर करुन चित्रपट निर्माता बेलमकोंडा सुरेश आणि त्याचा सहकारी सत्यनारायण चौधरीवर गोळी झाडली होती. तर अटक केल्यानंतर नंदमुरी यांनी आत्मरक्षासाठी केल्याचं सांगितलं.
नंदमुरी यांनी त्यांच्या असिस्टंट सोबत गैरवर्तन केलं होतं. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. 2017 मध्ये बालकृष्ण यांनी त्यांच्या असिस्टंटला डोक्यावर मारताना पाहिलं होतं. तर हे सगळं कॅमेऱ्यात कैद देखील झालं होतं. त्याशिवाय त्याला शूलेस बांधायला देखील सांगत होते.
हेही वाचा : 'मला नोकरीची चिंता नाही, आईच्या सन्मानासाठी...'; कुलविंदर कौरच्या पोस्टमागचं सत्य उघड!
राधिका आपटेनं नेहा धूपियाच्या शोमध्ये खुलासा केला होता की तिच्यासोबत सेटवर गैरवर्तन करण्यात आलं आहे. त्यानंतर तिनं सांगितलं की तिला माहित नव्हतं आणि तिच्या जवळ अभिनेता येऊन तिला गुदगुली करायचा.