रुपेरी पडद्यावर साकारणार 'खाशाबा', Nagraj Manjule दिग्दर्शित पहिला बायोपिक लवकर भेटीला!

Nagraj Manjule New Movie Khashaba : ऑलम्पिकच्या इतिहासात भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावंत पैलवान खाशाबा जाधव (Wrestler Khashaba Jadhav) यांच्या आयुष्यवर मला चित्रपट करायला मिळतोय ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे, असं नागराज मंजुळे म्हणतात.

Updated: Apr 21, 2023, 03:58 PM IST
रुपेरी पडद्यावर साकारणार 'खाशाबा', Nagraj Manjule दिग्दर्शित पहिला बायोपिक लवकर भेटीला! title=
Nagraj Manjule New Movie Khashaba

Nagraj Manjule, Khashaba: प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा सध्या घर बंदुक आणि बिर्याणी हा चित्रपट चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. अनेकांना हा चित्रपट भावला असून अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता नागराज अण्णा यांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा (Nagraj Manjule New Movie) केली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित हा पहिला बायोपिक असणार आहे. फेसबूकवर त्यांनी पोस्ट करत यावर माहिती दिली. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

काय म्हणाले Nagraj Manjule ?

ऑलम्पिकच्या इतिहासात भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावंत पैलवान खाशाबा जाधव (Wrestler Khashaba Jadhav) यांच्या आयुष्यवर मला चित्रपट करायला मिळतोय ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे, असं नागराज मंजुळे म्हणतात. फँड्री, सैराटनंतर 'खाशाबा' हा माझा तिसरा मराठी चित्रपट असेल जो मी दिग्दर्शित करतोय, असं म्हणत त्यांनी नवीन सिनेमाची घोषणा केली आहे. जिओ स्टुडिओ, ज्योती देशपांडेंसोबत ही माझी पहिलीच फिल्म आहे. निखिल साने सर फँड्रीपासून सोबत आहेतच. हा प्रवास नक्कीच रंजक आणि संस्मरणीय असेल, असा विश्वास देखील त्यांनी (Nagraj Manjule On Khashaba) यावेळी व्यक्त केला आहे.

आणखी वाचा - Nagraj Manjule: लंडनमध्ये असं काय झालं होतं? नागराज म्हणतात, 'अचानक रूममध्ये धूर आला अन्...'

काहीच दिवसांपूर्वी कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात महाशिवरात्री निमित्त कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी नागराज मंजुळे उपस्थित होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या तिसऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली होती. कुस्ती हा जिव्हाळ्याचा विषय आहे, माझा आगामी चित्रपट खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर असेल, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता फेसबूक पोस्टद्वारे (Nagraj Manjule Facebook Post) चित्रपटाची पहिली झलक दाखवली आहे.

पाहा पोस्ट

दरम्यान, खऱ्या आणि अस्सल मातीमधील, पण जागतिक स्तरावर नाव कमवणाऱ्या खेळाडूची खरी ओळख लोकांपर्यंत न्यायची आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा, असा चित्रपट करण्याचा माझा प्रयत्न राहिल, असं नागराज मंजुळे यांनी म्हटलं होतं. पैलवान खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्याचबरोबर या सिनेमात खाशाबा जाधव यांची भूमिका कोण साकारणार? यावर देखील चर्चा होताना दिसत आहे.

कोण आहेत खाशाबा जाधव ?

स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान अशी खाशाबा जाधव यांची ओळख आहे. हॉकीचे जादूगार म्हटले जाणारे मेजर ध्यानचंद आणि पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताला जागतिक पातळीवर नवी उंची मिळवून दिली. मराठमोळ्या पैलवानाने 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये बँटमवेट कुस्ती प्रकारात कांस्य जिंकलं होतं. भारताला पहिलं वैयक्तिक मेडल मिळवून देण्याचा भीमपराक्रम त्यांनी केला होता.