आता 'या' रहस्यमय आजाराची दहशत, 43 जणांना संक्रमण तर 5 जणांचा मृत्यू

कोरोना पाठोपाठ आता या आजाराची दहशत 

Updated: Apr 2, 2021, 10:55 AM IST
आता 'या' रहस्यमय आजाराची दहशत, 43 जणांना संक्रमण तर 5 जणांचा मृत्यू  title=

मुंबई : कोरोना महामारीच्या दरम्यान कॅनाडात एक रहस्यमय डोक्याच्या आजाराची दहशत पसरली आहे. 'मॅड काऊ डिझिज' (Mad Cow Disease) सारख्या आजारामुळे आतापर्यंत 5 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर 43 जणांना याची लागण झाली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, हा अतिशय दुर्लक्षित आणि घातक असा डोक्याचा विकार आहे. ज्याला क्रुट्जफेल्ट-जॅकोब डिझिज (Creutzfeldt-Jakob Disease- CJD) नावाने ओळखले जात आहे. आतापर्यंत या प्रकरणाच्या 6 गोष्टी समोर आल्या आहेत. कॅनडाच्या न्यू ब्रंसविक (New Brunswick) च्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची 43 संक्रमित लोकांना लागण झाली आहे. 

आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू 

कॅनडाच्या आरोग्य विभागाडून या आजाराची माहिती घेतली जात आहे. पाच लोकांना या आजाराची लागण झाली होती. पुढे अशी माहिती मिळाली की, अज्ञात न्यूरोलॉजिकल आजार काय आहे? ज्यामुळे एवढ्या लोकांना लागण झाली आहे.

'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, 2015 मध्ये पहिल्यांदा हा आजार झाला होता. ज्यानंतर हा आजार झपाट्याने पसरत होता. त्यानंतर 2020 मध्ये 24 जणांना याची लागण झाली. या वर्षाच्या सुरूवातीला 6 जणांना याची लागण झाली आहे. 

Mad Cow Disease काय आहे?

 

मॅड काऊ डिजीज हा गाईला होणारा एक आजार आहे. बोव्हन स्पॉन्जीफॉर्म एन्सेफैलोपैथी (बोवाइन स्पॉन्गफॉर्म एन्सेफॅलोपॅथी -बीएसई) च्या नावावरुन जाण्यासारखे आहे. हे एक असामान्य प्रोटीन कारणास्तव संसर्गामुळे होणारा त्रासदायक न्यूरोलॉजिकल रोग आहे. या आजारामुळे मस्तक म्हणजे डोकं आणि पाठीच्या हड्डीला प्रभाव पडतो.. तसे 1982 मध्ये ब्रिटनमध्ये घडलेल्या या आजाराची ओळख आहे. पण, शोधकर्त्यांचा दावा आहे की, 1970 साली या आजाराची सुरूवात झाली.