MTV Love School फेम टीव्ही अभिनेत्याचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

सिद्धार्थ शुक्लानंतर आणखी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचं निधन

Updated: Sep 23, 2021, 06:17 PM IST
MTV Love School फेम टीव्ही अभिनेत्याचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा title=

मुंबई: नुकताच बिग बॉस 13 विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्याने मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आता आणखी एक दु:खद घटना समोर आली आहे. MTV Love School फेम टीव्ही अभिनेत्याचं निधन झालं आहे. अभिनेता जगनूर अनेजाचं कार्डियक अरेस्टमुळे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. 

अभिनेता जगनूर अनेजाला सोशल मीडियावर अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. जगनूरच्या निधनाच्या बातमीनं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. जगनूर मिस्त्र इथे आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेत होता. त्याचं निधन हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यासंदर्भात सध्या तरी कोणतीही अधिक माहिती मिळाली नाही. 

त्याने आपल्या सुट्ट्या एन्जॉय करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले होते. जगनूरच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

जगनूर करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकर यांच्या शो एमटीव्ही लव्ह स्कूलच्या सीझन एक आणि दोनमध्ये दिसला होता. पहिल्या सत्रात त्याने त्याची गर्लफ्रेंड मनीषासोबत भाग घेतला होता. पण नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. मनीषासोबत ब्रेकअप झाल्यानंतर जगनूर मोनिकासोबत रिलेशनशिपमध्ये आला. मोनिकासोबतचे त्याचे नातेही फार काळ टिकलं नाही आणि काही काळानंतर मोनिका आणि जगनूर देखील वेगळे झाले.