Rani Mukherjee New Movie: बॉलिवूडची 'मर्दानी' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राणी मुखर्जीचा (Rani Mukherjee) नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राणी मुखर्जीचा आगामी चित्रपट मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वेचा (Mrs Chatterjee Vs Norway) दमदार ट्रेलर समोर आला आहे. हा चित्रपट नॉर्वेमध्ये राहणारी बंगाली महिला आणि तिच्या दोन मुलांवर आधारित आहे. झी स्टुडिओने आपल्या यूट्यूब चॅनलवर ट्रेलर पोस्ट केला आहे. सध्या राणीच्या आगामी सिनेमातला लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.
वाचा: Amitabh Bachchan यांच्या सुरक्षतेसाठी 'या' देशात तैनात केले होते अर्धे वायुदल, नेमकं कारण काय?
ट्रेलरची सुरुवात ही मिसेस चॅटर्जी (Mrs Chatterjee Vs Norway) या दोन मुलं आणि पतीसह नॉर्वेमध्ये राहतात. अचानक एके दिवशी दोन स्त्रिया त्यांची मुले त्यांच्याकडून हिसकावून घेतात आणि त्यांना एका पाळणाघरात ठेवतात. तिथल्या सरकारला वाटतं की श्रीमती चटर्जी आपल्या मुलांची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत. पण ती आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी नॉर्वे आणि भारतातील कोर्टात जाते. तिला तिची मुलं कोणत्याही परिस्थितीत परत हवी असतात. मी एक चांगली आई आहे... असा डायलॉग राणी ट्रेलरमध्ये बोलताना दिसत आहे. बॉलिवूड मधले सुप्रसिद्ध दिग्दर्शक निखिल अडवाणी यांच्याकडे या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आहे. हा चित्रपट 21 मार्चला राणीच्या वाढदिवसाला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान राणीने शेवट 'बंटी और बबली' सिनेमात काम केलं. अभिनेता सैफ अली खान सोबत राणीची जोडी जमली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी झाला तरीही राणीच्या अभिनयाचं मात्र कौतुक झालं. मिसेस चॅटर्जी vs नॉर्वे हा सिनेमा 21 मार्च 2023 ला रिलीज होतोय. राणीने 21 एप्रिल 2014 ला सध्या यशराज फिल्म्सचे सर्वेसर्वा असलेले आदित्य चोप्रा सोबत लग्न केलं. लग्नानंतर राणी अभिनय क्षेत्रातुन ब्रेक घेईल असं वाटलं होतं. परंतु लग्नानंतर काहीच महिन्यात आलेल्या मर्दानी सिनेमातून राणीने पोलीस ऑफिसरची भूमिका साकारून दमदार कमबॅक केलं.