मौनी रॉयसोबत गर्दीत घडला धक्कादायक प्रकार; भितीने लागली थरथरायला

भर गर्दीत मौनी रॉयसोबत घडला विचित्र प्रकार 

Updated: Dec 9, 2021, 02:28 PM IST
मौनी रॉयसोबत गर्दीत घडला धक्कादायक प्रकार; भितीने लागली थरथरायला

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) चे भरपूर चाहते आहेत. मौनी रॉय जेव्हापण घराबाहेर पडते. तेव्हा असंख्य चाहते तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी उत्सुक असतात. बुधवारी अशीच चाहत्यांनी गर्दी मौनी रॉयशेजारी जमली. या गर्दीत मौनी रॉयसोबत धक्कादायक प्रकार घडला. त्या घटनेच्या धक्क्यातून अजून मौनी रॉय सावरलेली नाही. 

अज्ञाताने मौनीसोबत केला असा प्रकार 

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मौनीसोबत सेल्फी घेण्यासाठी तोबा गर्दी जमली आहे. या दरम्यान हुडी घातलेला एक व्यक्ती मौनीसोबत सेल्फी घेण्यासाठी फोटो सरकतो. तो एवढ्यावरच थांबत नाही. तर तो पुढे सरकून मौनीच्या हातावर जोरात फटका मारतो.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

यामुळे मौनी अतिशय घाबरते. तिथून थोडी दूर होते. मात्र चाहत्यांच्या गर्दीत अडकलेल्या मौनी रॉयला तेथून बाहेर पडणं जमत नाही. तेथे असलेल्या दुसऱ्या चाहत्यांसोबत ती सेल्फी काढते. आणि निघून जाते.

चाहत्याच्या या कृत्यावर भडकले चाहते 

मौनी रॉयसोबतच्या चाहत्याच्या या कृतीवर यूजर्स संतापले. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, कृपया तिचा आदर करा कारण ती देखील एक व्यक्ती आहे. दुसऱ्याने लिहिले, चाहते कसे आहेत, हे लोक फोटो काढण्यासाठी आत जातात. कोणीतरी लिहिले, या लोकांना वाटते की त्यांनी सेलेब्स विकत घेतले आहेत.

या सिनेमात दिसणार मौनी रॉय 

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर मौनी रॉय 'वेले' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती अभय देओल आणि करण देओलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय मौनी रॉय 'ब्रह्मास्त्र' या सुपरहिरो चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अंतिम तारीख अद्याप समोर आलेली नाही.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x