...सिर्फ प्यार! 'द हर्षद मेहता स्टोरी' फेम अभिनेता 'या' 78 वर्षीय अभिनेत्रीच्या प्रेमात

जगात जर कोणती भावना किंवा कोणता एखादा नि:स्वार्थ घटक असेल, तर तो म्हणजे प्रेम

Updated: May 14, 2022, 10:36 AM IST
...सिर्फ प्यार! 'द हर्षद मेहता स्टोरी' फेम अभिनेता 'या' 78 वर्षीय अभिनेत्रीच्या प्रेमात  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : जगात जर कोणती भावना किंवा कोणता एखादा नि:स्वार्थ घटक असेल, तर तो म्हणजे प्रेम. कशाचीही अपेक्षा न ठेवता, कसलीही तमा न बाळगता केलं जातं तेच खरं प्रेम आणि हेच प्रेम खऱ्या अर्थानं यशस्वी ठरतं. सध्या अशाच प्रेमाची जाणीव 'स्कॅम 1992' (Scam 1992) मध्ये मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेता प्रतीक गांधी याला होत आहे. (Pratik Gandhi )

खुद्द प्रतीकनंच यासंबंधीचा खुलासा केला. जिथं त्यानं आपल्या मनाला भावलेल्या 78 वर्षीय अभिनेत्रीबाबतचा खुलासा केला. 

मुख्य म्हणजे एक कलाकार म्हणून प्रतीकच्या मनाला ज्या अभिनेत्री भावल्या त्यांच्यासोबतच स्क्रीन शेअर करताना तो त्यांच्या प्रेमात पडला. 

अर्थात हे एका कलाकारानं दुसऱ्या कलाकारावर केलेलं प्रेम होतं. प्रतीक सध्या  'मॉडर्न लव मुंबई' (Modern Love Mumbai) या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये तो एका समलैंगिक व्यक्तीची भूमिका साकारत आहे. 

सर्वांपासून आपली खरी ओळख लपवणारं प्रतीकचं पात्र त्याच्या आजीपासून मात्र ही बाब लपवत नाही. सीरिजमध्ये प्रतीकच्या आजीची भूमिका साकारली आहे, अभिनेत्री तनुजा यांनी. 

तनुजा यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्रीसोबत काम करण्याचा अनुभव प्रतीकनं एका मुलाखतीत सांगितला. जिथं आपण त्यांच्यासोबत काम करताना भारावून गेल्याची भावना त्यानं व्यक्त केली. 

'जसं सांगण्यात आलं होतं, त्या तशाच अदभूत आहेत. आमचं पहिलं दृश्य होतं, जिथं आम्हाला काही पायऱ्या चढायच्या होत्या. ती इमारत फारच जुनी असल्यामुळं तिथं लिफ्ट नव्हती. मला वाटलं त्या थकतील. पण, कॅमेरा रोल होण्यास सुरुवात झाली आणि त्यांचा उत्साह द्विगुणितच झाला. त्यांच्यावरून माझी नजरच हटत नव्हती', असं तो म्हणाला. 

आदर्श प्रेम म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर देताना प्रतीकनं आपण बरीच वर्षे सुरुवातीच्या काळात चित्रपटच पाहिले नसल्याचं सांगत, राधा-कृष्णाची प्रेमकथा आपल्यासाठी आदर्शस्थानी असल्याचंही तो म्हणाला.