Fertility Treatment: फर्टिलिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदाचा आधार; सेलिब्रिटीनं Sex सोबत 'या' सवयीही त्यागल्या

कधी कल्पनाही केली नव्हती, अशा सवयी तिनं यादरम्यनच्या काळात सोडल्या.   

Updated: Jun 6, 2022, 09:37 AM IST
Fertility Treatment: फर्टिलिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदाचा आधार; सेलिब्रिटीनं Sex सोबत 'या' सवयीही त्यागल्या  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अतिशय घाईगडबडीच्या या जीवनात आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीचे थेट परिणाम आरोग्यावर होताना दिसतात. अनेकदा हे परिणाम क्षणिक असतात, तर कित्येकदा या परिणामांची तीव्रता जास्त असते. या साऱ्यावर औषधं तरी किती घ्यायची, असा प्रश्नही अनेकजण करतात. 

लोकप्रिय सेलिब्रिटीसोबतही असंच घडल होतं. ही सेलिब्रिटी म्हणजे सुपरमॉडल कॉर्टनी कार्दशियन (kourtney kardashian). आपण इनफर्टिलिटीच्या समस्येचा सामना करत असल्याचं कॉर्टनीनं सांगितलं. 

या अडचणीवर मात करण्यासाठी तिनं भारतीय आयुर्वेद पद्धतीचा वापर केला. कधी कल्पनाही केली नव्हती, अशा सवयी तिनं यादरम्यनच्या काळात सोडल्या. 

आई होण्याचं सुख अनुभवण्यासाठी तिनं आयुर्वेदाचा (Ayurved) आधार घेतला. यातील पंचकर्म (Panchakarma) थेरेपीला निवडत त्याअनुषंगानं तिनं सर्व नियमांचं पालनही केलं. 

कॉर्टनी कार्दशियन आणि तिचा पार्टनर ट्रेविस बार्कर यांनी शरीराची डिटॉक्स ट्रिटमेंट करुन घेतली आहे. या उपचारादरम्यान त्यांना पंचकर्म शुद्धीशी संबंधित प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली. 

कॉर्टनी सध्या घेत असणारे उपचार पाहता, या मार्गानं आपली इन्फर्टिलिटीची समस्या नक्कीच दूर होईल. या उपचारादरम्यान दोघांनीही शरीरसंबंध आणि मद्यसेवनापासून स्वत:ला दूर ठेवलं. 

सर्व प्रक्रियांनंतर आयवीएफ ट्रीटमेंटचाही आधार या जोडीनं घेतला. पण, त्यातसुद्धा त्यांना अपयशच मिळालं. परिणामी शेवटी त्यांनी पंचकर्माचा मार्ग निवडला. 

पंचकर्म म्हणजे काय ? 
पंचकर्म एक अशी पद्धत आहे, ज्यामध्ये शरीरातील विषारी घटक बाहेर काढले जातात.  वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण आणि अनुवासनावस्ती असे पाच टप्पे या प्रक्रियेत आहेत. आयुर्वेदात पंचकर्माला अनन्यसाधारण महत्त्वं आहे.