'राज साहेबांचा हात खांद्यावर पडला अन्...'; 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराचे ठाकरेंकडून कौतुक

मराठी सिनेसृष्टीतील एका कलाकार जोडप्याला राज ठाकरेंनी कौतुकाची थाप दिली आहे. त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

Updated: Jan 27, 2024, 07:52 PM IST
'राज साहेबांचा हात खांद्यावर पडला अन्...'; 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराचे ठाकरेंकडून कौतुक title=

Raj Thackeray Appreciate Tushar Deval : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अनेक राजकीय नेत्यांपासून कलाकार मंडळीही त्यांचे चाहते आहेत. अनेक कलाकार हे त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असतात. अशातच मराठी सिनेसृष्टीतील एका कलाकार जोडप्याला राज ठाकरेंनी कौतुकाची थाप दिली आहे. त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्या कलाकाराने स्वत: पोस्ट करत याबद्दल भावना व्यक्त केल्या. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बोरीवलीत भव्य मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या मिसळ महोत्सवाला आज राज ठाकरेंनी हजेरी लावली. यावेळी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील अभिनेत्री स्वाती देवल आणि तिचा पती तुषार देवल यांच्या मिसळ स्टॉलला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मिसळचे कौतुक केले. तसेच तुषार देवलला कौतुकाची थापही दिली. तुषारने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. 

"त्यांनी खांदयावर हात ठेऊन शुभेच्छा दिल्या"

तुषारने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यात राज ठाकरे हे तुषारची विचारपूस करताना आणि त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. यावेळी तुषारने 'अजून काय पाहिजे राव, साहेबांचा हात खांद्यावर पडला, साहेबांचा आशीर्वाद मिळाला', असे म्हटले आहे. या फोटोला त्याने हटके कॅप्शनही दिले आहे. "पहिल्यांदाच राज साहेबाना एवढ्या जवळून बघितलं. त्यांना आमच्या मिसळी विषयी सांगितलं आणि त्यांनी खांदयावर हात ठेऊन शुभेच्छा दिल्या. बस्स, अजून काय पाहिजे. एवढ्या गर्दीत 2 शब्द ऐकून घेतल्या बद्दल राज साहेब मनापासून धन्यवाद", असे तुषार देवलने म्हटले आहे. 

त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. तुषारच्या या पोस्टवर पत्नी स्वाती देवलनेही हार्ट इमोजी टाकत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अनेक कलाकारही यावर कमेंट करत त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tushar Deval (@tushardeval)

दरम्यान तुषार देवल हा ‘चला हवा येऊ द्या’मधील प्रसिद्ध संगीत संयोजक आणि संगीतकार म्हणून काम करतो. तुषार देवलची लोकप्रियता तितकीच आहे. कधी एखाद्या प्रसंगाला योग्य संगीत देत, तर कधी आगरी भाषेमध्ये हटके बोलत तो प्रेक्षकांची मन जिंकतो.  तुषार देवलची पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. स्वाती देवल ही 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली. तिने कलाविश्वामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘कुंकू’, ‘कळत नकळत’, ‘पारिजात’, ‘वादळवाट’, ‘विवाहबंधन’, ‘फु बाई फु’, ‘पुढचं पाऊल’ यांसह अनेक मालिकांमध्ये ती झळकली.