'मिशन मंगल' चित्रपटाच्या दिग्दर्शकाची परिस्थिती चिंताजनक

मिशन मंगल चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे.  

Updated: Jan 27, 2020, 05:15 PM IST
'मिशन मंगल' चित्रपटाच्या दिग्दर्शकाची परिस्थिती चिंताजनक  title=

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या 'मिशन मंगल' चित्रपटाचे दिग्दर्शक जगन शक्ती यांची परिस्थिती खालावली आहे. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाय त्यांची परिस्थिती गंभीर असल्याच्या चर्चा देखील होत आहेत. त्यांच्या मेंदूमध्ये रक्त गोठलं असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

जगन शक्ती त्यांच्या मित्रांसोबत वेळ व्यतीत करत होते. तेव्हा अचानक त्यांना भोवळ आली आणि ते खाली पडले. त्यानंतर जगन यांना तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जगन यांच्या परिस्थितीची माहिती मिळताच त्यांचे कुटुंब  देखील मुंबईत आले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

SCAN- 'BLOCKBUSTER'- Watch #MissionMangal with your family in your nearest cinemas!

A post shared by AKSHAY KUMAR FANS GROUP(@akfansgroup) on

मिशन मंगल चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक देखील करण्यात आले. त्यांनी आर बाल्कीसोबत देखील उल्लेखणीय काम केलं आहे. शिवाय अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सहायक दिग्दर्शकाचे काम पाहिले आहे. 

'मिशन मंगल' चित्रपटानंतर ते पुन्हा अक्षयसोबत झळकणार असल्याची चर्चा रंगली होती. 'इक्का' नावाचा चित्रपट सकारण्याचा त्यांचा मानस आहे. हा चित्रपट तामिळ 'कत्थी'चा रिमेक असणार आहे.