अखेर प्रतीक्षा संपली... Mirzapur च्या मुन्नाकडून मोठी घोषणा

प्रेक्षक कित्येक दिवसांपासून मिर्झापूर 3 च्या प्रतिक्षेत आहेत. 

Updated: Feb 25, 2022, 04:20 PM IST
 अखेर प्रतीक्षा संपली... Mirzapur च्या मुन्नाकडून मोठी घोषणा title=

मुंबई : 'मिर्झापूर 3'ची वाट पाहणाऱ्यांसाठी मुन्ना भैया एक सरप्राईज घेऊन येणार आहे. मुन्ना भैया म्हणजेच अभिनेता दिव्येंदू शर्मा यशराज चित्रपटाच्या पहिल्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ज्याचं नाव 'द रेल्वे मेन' असं आहे. या सीरिजमध्ये दिव्येंदू पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.

प्रेक्षक कित्येक दिवसांपासून मिर्झापूर 3 च्या प्रतिक्षेत आहेत. पण याआधी मुन्ना म्हणजेच दिव्येंदू नवीन भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी देखील त्यांचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

दिव्येंदू शर्माने भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित असलेल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या खडतर रात्रीच्या शूटिंगबद्दल खुलासा केला. रेकॉर्ड केलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 15,000 हून अधिक लोक मारले गेले आणि 600,000 हून अधिक कामगार जखमी झाले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याच्या शूटिंग शेड्यूलबद्दल बोलताना, दिव्येंदूने शेअर केले की मी रात्रीचं शूटिंग करत आहे कारण ही सीरिज भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित आहे. मी गेला महिनाभर रात्री शूटिंग केलं आहे. हे माझ्या आयुष्यातील आतापर्यंतचे सर्वात कठीण शूट असल्याचं दिव्येंदूने म्हटलं आहे.