ब्रेकअपच्या चर्चांवर मिलिंद अंकिताचे न बोलता उत्तर....

मिलिंद सोमण आणि त्याची २५ वर्षांची गर्लफ्रेंड अंकिता यांचे ब्रेकअप झाल्याच्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रंगल्या होत्या

Updated: Apr 20, 2018, 05:08 PM IST
ब्रेकअपच्या चर्चांवर मिलिंद अंकिताचे न बोलता उत्तर.... title=

मुंबई : अभिनेता-मॉडल मिलिंद सोमण आणि त्याची २५ वर्षांची गर्लफ्रेंड अंकिता यांचे ब्रेकअप झाल्याच्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रंगल्या होत्या. अंकिताला लॉट्री लागल्याने ती मिलिंदला सोडून गेल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. या अफवांना उधाण आल्यावर मिलिंद सोमणची गर्लफ्रेंड अंकिताने इंस्‍टाग्रामवरुन फोटोज शेअर केले. पण यावर त्यांनी न बोलता उत्तर दिले आहे. पहा या अफवांना पूर्णविराम लावण्यासाठी त्यांनी काय केले?

मिलिंद म्हणतो..

तर मिलिंद सोमणनेही दोघांचे फोटोज शेअर करत या चर्चा खोट्या असल्याचे सिद्ध केले. मिलिंदने आपले फोटोज शेअर करत लिहिले की, चांगल्यावर लक्ष केद्रींत करा... चांगल्या सवयी चांगल्या आयुष्यासाठी... प्रेमात गुंतलेला...

 

#focus on the good  #BetterHabits4BetterLife #surroundedbylove

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

लवकरच विवाहबद्ध

अंकिता मिलिंदपेक्षा २५ वर्षांनी लहान आहे. अलिकडेच आलेल्या वृत्तानुसार, दोघं लवकरच विवाहबद्ध होतील. हे दोघेही अलिबागमध्ये खाजगीरित्या विवाह करणार आहेत. मात्र यावर या दोघांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. 

अशी होती पहिली भेट

त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल मिलिंद सोमण एका मुलाखतीत बोलला की, तो कधी नाईटक्लबमध्ये जात नाही. पण त्या दिवशी कदाचित त्यासाठी तिथे गेलो होतो. मी नाचत असताना माझी नजर अंकितावर गेली. मी तिला माझा नंबर दिला आणि सांगितले की, तू मला फोन करु शकतेस. त्याच्या दूसऱ्या दिवशी तिचा फोन आला आणि तेव्हापासून आम्ही एकमेकांना भेटत आहोत.