मुंबई : न्यूयॉर्कमध्ये नुकताच यंदाच्या वर्षीचा मेट गाला 2022 (Met Gala 2022) मोठ्या दिमाखात पार पडला. फॅशन जगतातील सर्वात मोठ्या अशा या सोहळ्याला बऱ्याच सेब्रिटींनी हजेरी लावली. इथं अनेक सेलिब्रिटींनी फॅशन, स्टायलिंग या साऱ्याच्या मर्यादा ओलांडत चौकटीबाहेर जाणारी फॅशन सादर केली.
यामध्ये लक्ष वेधून गेली ती म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची जाऊ, सोफी टर्नर. 'गेम ऑफ थ्रोन्स'मुळं प्रकाशझोतात आलेल्या सोफी टर्नर हिनं यावेळी रेड कार्पेटवर पती जो जोनास हिच्यासोबत हजेरी लावली होती.
गरोदर असतानाही सोफीनं सुरेख स्टाईल स्टेटमेंट देत सर्वांची मनं जिंकली. यावेळी तिनं Louis Vittonच्या डिझायनर ड्रेसला पसंती दिली होती. फ्लोर लेंथ गाऊन, प्लॅटफॉर्म सँडल, ओपन स्लीर वेव हेअरस्टाईल आणि ब्राईट रेड लिप्स्टीकच्या मदतीनं तिचा लूक उठावदार करण्यात आला होता.
जो जोनासनं या सोहळ्यासाठी व्हाइट टक्स विद लॉन्ग लेस coattail फिनिश्ड आउटफिटला पसंती दिली होती. 2019 नंतर एखाद्या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटला येण्याची सोफी आणि जो यांची पीह पहिलीच वेळ होती.
ही जोडी लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज आहे. 2020 मध्ये त्यांनी मुलगी, विला हिचं आपल्या नात्यात स्वागत केलं होतं. सोफी आणि जोनं कायमच फॅशनच्या बाबतीतही नवे ट्रेंड सेट केले आहेत. मेट गालाचं रेड कार्पेटही याला अपवाद ठरलं नाही.