साऱ्या जगानं पाहिला यांचा Romance; तो आला, तिला मिठीत घेतलं आणि...

की इथं तुम्हाला बऱ्याच अशा गोष्टी पाहायला मिळतील ज्यावर विश्वास ठेवणं कठीणच.   

Updated: May 3, 2022, 04:01 PM IST
साऱ्या जगानं पाहिला यांचा Romance; तो आला, तिला मिठीत घेतलं आणि...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : दर मिनिटाला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी नवं पाहायला मिळतं. बरं या नव्याचे निकषही तितकेच वेगळे बरं. मुळात सोशल मीडिया हे व्यासपीठच इतकं मोठं आहे, की इथं तुम्हाला बऱ्याच अशा गोष्टी पाहायला मिळतील ज्यावर विश्वास ठेवणं कठीणच. 

असाच एक गोड व्हिडीओ आणि काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा व्हिडीओ आहे, यंदाच्या मेट गाला 2022 सोहळ्यातील. (Met Gala 2022)

एकिकडे बरेच सेलिब्रिटी त्यांच्या स्टाईल स्टेटमेंट फ्लाँट करत रेट कार्पेटवर येत असतानाच दुसरीकडे मेट गालामध्ये अतिशय सुरेख असे प्रेमाचे क्षणही पाहायाला मिळाले. 

जिथं न्यूयॉर्क सिटी डिपार्टमेंट ऑफ कल्चरल अफेयर्सच्या कमिश्नरपदी असणाऱ्या Laurie Cumbo हिला तिच्या प्रियकरानं संपूर्ण जगासमोरच प्रपोज केलं. लॉरीसाठी त्यानं एक अंगठी आणली होती. 

Bobby Digi Olisa यानं या सोहळ्यात अंगठी आणत तो लॉरीपुढे गुडघ्यांवर बसला आणि हजारो कॅमेऱ्यांच्या साक्षीनं त्यानं तिला प्रपोज केलं. लॉरिच्या हाती त्यानं अंगठीही घातली. 

(Video Credits- NBC New York)

यावेळी दोघांनीही एकमेकांना किस करत आपण एका नव्या नात्यात बांधलो गेल्याची ग्वाही संपूर्ण जगाला दिली. लॉरी आणि बॉबी यांच्या नात्यानं  यंदाचं मेट गाला आणखी एका वेगळ्या कारणानं गाजवलं असंच हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून म्हणावं लागत आहे.