'छपाक'च्या निमित्ताने दीपिका- विक्रांतची हवीहवीशी 'नोक- झोक'

पाहा, चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला....   

Updated: Dec 18, 2019, 03:32 PM IST
'छपाक'च्या निमित्ताने दीपिका- विक्रांतची हवीहवीशी 'नोक- झोक' title=
Chhapaak

मुंबई : काही व्यक्तींच्या सोबत असण्यानेही बऱ्याच असाध्य गोष्टीसुद्धा सुकर वाटू लागतात. ही भावना असते प्रेमाची, आपलेपणाची, हक्काची आणि एखाद्याप्रती असणाऱ्या विश्वासाची, एखाद्यासाठीच्या ओढीची. याच सर्व भावना एकवटत Chhapaak 'छपाक' या चित्रपटातील Nok Jhok 'नोक झोक' हे गाणं साकारण्यात आलं आहे. 

Deepika Padukone दीपिकाने साकारलेली 'मालती' या गाण्यातून आणखी उलगडत जाते, यामध्ये तिला साथ मिळते ती म्हणजे विक्रांतची Vikrant Massey. मेघना गुलजार दिग्दर्शित हे गाणं म्हणजे जणू ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या आणि न्यायासाठी लढणाऱ्या मालतीच्या जीवनात आलेला एका सुरेख भावनेचा बहर. आता ही भावना प्रेमाची आहे, की सकारात्मकतेची ही चित्रपटातूनच अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट होणार आहे. 

शंकर-एहसान-लॉय या संगीतकार त्रिकूटाने संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे बोल ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी लिहिले आहेत. मेघना गुलजार यांच्या दिग्दर्शनात साकारलेला चित्रपच, त्यात बी- टाऊनमधील लोकप्रिय संगीतकारांचं संगीत आणि गीतकार गुलजार यांच्या शब्दांनी बहरलेली गीतं म्हणजे प्रेक्षकांसाठी जणू परवणीच. 

Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच

अतिशय संवेदनशील विषयावर भाष्य करत तितक्याच परिणामकारकपणे 'छपाक' हा चित्रपट साकारण्यात आला आहे. १० जानेवारी २०२०ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून ऍसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनातील काही प्रसंगांवर प्रकाशझोत टाकला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला, ज्यानंतर या चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली. एक कलाकार म्हणून दीपिकाने घेतलेली मेहनत आणि यामध्ये तिला मिळालेली विक्रांतची साथ पाहता नव्या वर्षाची सुरुवात या कलाकारांच्या कारकिर्दीला कोणत्या उंचीवर नेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.